Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > शेती

हिंगोली अवकाळीग्रस्त शेतकरी

हिंगोली जिल्ह्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 45 लाखांचे अनुदान मंजूर

Hingoli seasoned farmer: हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्च 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीसाठी 45 लाख रुपयांची मदत राज्य शासनाने मंजूर केली.


हिंगोली जिल्ह्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 45 लाखांचे अनुदान मंजूर

Hingoli seasoned farmer |

हिंगोली (Hingoli seasoned farmer) : मार्च 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्यासाठी 45.03 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महसूल व वन विभागाने 18 मे 2026 रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे.

राज्यात मार्च 2026 मध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस झाला होता. या (Hingoli seasoned farmer) नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शासनाने एकूण 164 कोटी 83 लाख 44 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांनी 5 मे 2026 रोजी सादर केलेल्या प्रस्तावानुसार हिंगोली जिल्ह्यात 498 शेतकरी बाधित झाले असून 260.78 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. याच नुकसानीपोटी जिल्ह्यासाठी 45.03 लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे.

शासन निर्णयानुसार ही मदत DBT पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. एका हंगामात एक वेळेस विहित दराने ही मदत दिली जाणार असून, दुबार मदत होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच मंजूर निधी इतर कारणांसाठी वळती करता येणार नाही, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर विभागासाठी एकूण 6 कोटी 82 लाख 22 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यामध्ये हिंगोली, नांदेड, धाराशिव, जालना व लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात सर्वाधिक नुकसान नाशिक विभागात नोंदवले गेले असून तेथे 145 कोटी 87 लाख रुपयांचा निधी वितरित होणार आहे.