Breaking News
  • टिम कुक यांच्या स्थानी जॉन टर्नस बनले ॲपलचे नवे CEO
  • बालेन सरकारचा मोठा निर्णय, आता महिन्यातून दोनदा मिळणार ​​​​​​​पगार
  • तिलक वर्माने रचला इतिहास,MI साठी झळकावले सर्वात जलद शतक
  • मोदींच्या दौऱ्याआधीच संकट; पचपद्रा रिफायनरीत २४ तास आधी भीषण आग
  • मुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘विकसित महाराष्ट्र 2047’साठी नवे निर्देश
  • राज्यात पुढील 4 दिवस वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा
  • फडणवीस म्हणजे ‘नालंदा विद्यापीठ’! महाडिकांची तोंडभरून स्तुती
  • औराद शहाजानीत उष्माघाताचा बळी; शेतात काम करताना शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी

होम > शेती

खरीप हंगाम नियोजन

खरीप हंगाम नियोजनार्थ कन्हानला म.औ.वि. महामंडळ व कृषी विभागांचा संयुक्त पाहणी दौरा

Kharif season planning: कन्हान येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि कृषी विभागाच्या अधिका-यांनी खरीप हंगामासाठी विविध प्रकल्पांची पाहणी केली, शेतक-यांना मार्गदर्शन केले.


खरीप हंगाम नियोजनार्थ कन्हानला मऔवि महामंडळ व कृषी विभागांचा संयुक्त पाहणी दौरा

Kharif season planning |

कन्हान (Kharif season planning) : खरीप हंगाम नियोजनार्थ कन्हान येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने वरिष्ट अधिका-यांनी पाहणी दौ-यात खताचा स्टाक, रेख पॉईट गोडावुन, कन्हान ऍग्रो व्हिजन ची निलज येथील रॉईस मिल, गहुहिवरा येथील अपंगत्व असलेल्या रविंद्र राऊत या शेतकरी युवकाने पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजने अंतर्गत स्थापन केलेल्या श्री कृष्ण डाळ मिल, गहु फिल्टर आटाचक्की या उद्योगाची उभारणी केलेल्या प्रकल्पास भेट देऊन शेतक-यांचे कौतुक केले. यावेळी उपस्थित शेतक-यांना वरिष्ट अधिका-यांनी मौलाचे मार्गदर्शन केले. 

कन्हान येथे मा. अशोक काकडे. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व मा. रविंद्र मनोहरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागपुर, मा.समाधान धुळधुळे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नाग पुर यांची खरीप हंगाम नियोजनार्थ शेतकरी बांधवांना , खताची टंचाई भासु नये याकरिता खताच्या बफर स्टॉकची पाहणी करून आढावा घेण्यात आला, तसेच कन्हान येथील रेख पॉइंटला भेट देऊन तेथील स्टॉक उतरताना कोणत्या प्रकारे काळजी घेतली जाते. या बाबत माहिती घेतली व कन्हान येथील रॅक पॉईंट च्या गोडाऊनची पाहणी करण्यात आली.  खताच्या आढा व्या बाबत माहिती घेतली. यावेळी कन्हान ऍग्रो व्हिज न शेतकरी उत्पादक कंपनी निलज येथील राईस मिल ची पाहणी व यांत्रिकीकरण पद्धतीने भात लागवडी बाबत माहिती घेतली. यावेळी मा. अशोक काकडे यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना यांत्रिकीकरण पद्ध तीने भात लागवडी बाबत आव्हान केले. 

या दौऱ्यात मध्ये गहुहिवरा येथील दोन्ही हात नसताना व पायाचे बोटे नसताना सुद्धा रविंद्र राऊत या शेतकरी युवकाने पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया योज ने अंतर्गत स्थापन केलेल्या श्री कृष्ण डाळ मिल, गहु फिल्टर आटाचक्की या उद्योगाची उभारणी केलेल्या प्रकल्पास भेट देण्यात आली. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी रविंद्र राऊत यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी उद्योग उभारण्याकरिता सहाय्यक कृषी अधिका री विवेकानंद शिंदे व तालुका कृषी अधिकारी राकेश वसु यांनी प्रेरित केल्याबाबत सांगितले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मा. रविंद्र मनोहरे यांनी तरुण पिढीने काही अपयश आल्यास सुद्धा खचुन न जाता शासनाच्या योजनांची माहिती घेऊन स्वतःच धाडस निर्माण करून औद्योगिक वाटचाल धरण्याचे आवाहन केले.

राऊत यांनी आपले स्वतःचे दोन्ही हात गमावुन देखिल अपंगत्व असताना सुद्धा हा व्यव साय उभा केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आणि तरुण बांधवांनी राऊत यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा. परिस्थितीला खचु न न जाता औद्योगिक वाटचाल धरावी असा संदेश दिला. याप्रसंगी शेतकरी बांधवासह मा. पेठे क्षेत्रिय व्यवस्थापक एम.आय. डी.सी., मा. शेंडे क्षेत्रिय व्यव स्थापक एम.आय.डी.सी, मा. वरखडे क्षेत्रिय व्यवस्था पक एम.आय.डी.सी, मा. राकेश वसु तालुका कृषी अधिकारी पारशिवनी, एस .पी. कुबडे गुण नियंत्रण अधिकारी, प्रभाकर शिरपुरकर मंडळ कृषी अधिकारी, कार्यक्रमा शेवटी उपस्थित सर्व मान्यवर व शेतकरी बांधवांचे आभार विवेकानंद शिंदे सहाय्यक कृषी अधिकारी यांनी शब्दसुमनाने व्यक्त केले.

Related to this topic: