Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > शेती

कृषी निविष्ठा संप स्थगित

कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बेमुदत संप स्थगित, उद्यापासून दुकाने सुरू होणार

Hingoli Agricultural Dealer: हिंगोलीतील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी पुकारलेला बेमुदत संप राज्य शासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे स्थगित केला. उद्यापासून सर्व दुकाने नियमित वेळेत सुरु होणार.


कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बेमुदत संप स्थगित उद्यापासून दुकाने सुरू होणार

Hingoli Agricultural Dealer |

हिंगोली (Hingoli Agricultural Dealer) : राज्य शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी पुकारलेला बेमुदत संप आज स्थगित करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उद्यापासून कृषी निविष्ठा प्रतिष्ठान सुरळीत चालू राहतील अशी माहिती संघटनेचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष आनंद दिल्यावर यांनी दिली आहे.

महाराष्ट्र फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स डीलर्स असोसिएशन, पुणे 'माफदा' चे अध्यक्ष विनोद तराळ पाटील यांनी सर्व विक्रेता बंधूंना याबाबत माहिती दिली. त्यांनी कळवले की, शासन स्तरावर झालेल्या चर्चेला यश आल्याने संपाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संघटनेने सर्व (Hingoli Agricultural Dealer) कृषी निविष्ठा विक्रेत्यांना उद्या, बुधवार दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी आपली प्रतिष्ठाने नियमित वेळेत उघडण्याचे आवाहन केले आहे. यामुळे बियाणे, खते व कीटकनाशकांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टळणार आहे. 

खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी निविष्ठा खरेदीसाठी बाजारात येत आहेत. संपामुळे पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र, शासनाने वेळेत दखल घेतल्याने हा प्रश्न सुटला आहे. माफदा पुणेचे अध्यक्ष विनोद तराळ पाटील, महासचिव विपीन कासलीवाल आणि खजिनदार प्रकाश नवलाखा यांनी संयुक्तपणे ही माहिती दिली. शासनाने मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले व सहकार्य करणाऱ्या सर्व विक्रेत्यांचे आभार मानले.
  
कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी (Hingoli Agricultural Dealer) विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाची हाक दिली होती. यामध्ये परवाना नूतनीकरण, तपासणी प्रक्रिया आणि इतर धोरणात्मक मुद्द्यांचा समावेश होता. शासनाने चर्चेचे दरवाजे खुले ठेवून तोडगा काढल्याने संप मागे घेण्यात आला. शेतकऱ्यांनी उद्यापासून आपल्या नजीकच्या कृषी सेवा केंद्रांवर जाऊन आवश्यक निविष्ठांची खरेदी करावी, असे आवाहन माफदाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी आपापली प्रतिष्ठान सुरळीत चालू करावीत असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष आनंद निलावार यांनी केले आहे.

Related to this topic: