चोर की माजी नगरसेवक? कमळाच्या देठाने श्वास घेऊन पाच तास पाण्यात लपून सुटण्याचा प्रयत्न

रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) अत्यंत नाट्यमय पद्धतीने कारवाई करत तलावात लपून बसलेल्या एका सराईत चोराला अटक केली आहे.

चोर की माजी नगरसेवक? कमळाच्या देठाने श्वास घेऊन पाच तास पाण्यात लपून सुटण्याचा प्रयत्न

Lake Hideout

भोपाळ (Lake Hideout) : रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) अत्यंत नाट्यमय पद्धतीने कारवाई करत तलावात लपून बसलेल्या एका सराईत चोराला अटक केली आहे. विविध राज्यांत २१ हून अधिक गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या या आरोपीचा पोलिसांकडून अनेक दिवसांपासून शोध सुरू होता. अखेर मध्य प्रदेशातील जबलपूर येथे त्याला पकडण्यात यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील रहिवासी असलेला हा आरोपी पहाटे सिहोरा रेल्वे स्थानकावर संशयास्पद हालचाली करताना RPF जवानांच्या नजरेस पडला. ट्रेन क्रमांक ११७५३ मधून उतरत असताना तो एका महिला प्रवाशाची पर्स चोरण्याचा प्रयत्न करत होता. ही बाब लक्षात येताच जवानांनी त्याचा पाठलाग सुरू केला.

पकड टाळण्यासाठी आरोपीने जवळच असलेल्या जलपर्णींनी भरलेल्या तलावात उडी मारली. अटकेपासून बचाव करण्यासाठी तो तब्बल पाच तास पाण्यातच लपून बसला होता. विशेष म्हणजे, श्वास घेण्यासाठी त्याने कमळाच्या देठाचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे.

यानंतर RPFने स्थानिक पोलिसांची मदत घेत पाणबुड्यांना पाचारण केले. त्यांच्या मदतीने आरोपीला तलावातून बाहेर काढण्यात आले. बाहेर आल्यानंतरही त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र जवानांनी कसून प्रयत्न करत त्याला अखेर जेरबंद केले.

प्राथमिक चौकशीत आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र कठोर चौकशीनंतर त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. हरविंदर सिंह (वय ३२) असे त्याचे नाव असून, विशेष म्हणजे तो २०१७ मध्ये निवडणूक जिंकून नगरसेवकही राहिला असल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीविरोधात मध्य प्रदेशसह इतर राज्यांमध्ये २१ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. अनेक प्रकरणांमध्ये तो फरार होता. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

संबंधित सामग्री

मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार; किरकोळ वादातून तरुणाला धावत्या ट्रेनमधून ढकलले, आरोपीला अटक

मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार; किरकोळ वादातून तरुणाला धावत्या ट्रेनमधून ढकलले, आरोपीला अटक

मुंबईच्या उपनगरीय लोकलमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा समोर आला आहे. दरवाजाजवळ उभे राहण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान हिंसक हल्ल्यात झाले.

Aug 28, 2026
सेनगाव पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी; अवैध धंद्यांची माहिती लपविल्यास पोलीस पाटलांवर कारवाई

सेनगाव पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी; अवैध धंद्यांची माहिती लपविल्यास पोलीस पाटलांवर कारवाई

Sengaon Police Action: सेनगाव पोलिस ठाण्याला वार्षिक तपासणी झाली. तपासणीतील लपविलेल्या अवैध धंद्यांबद्दल पाटलांवर कायदा कारवाई करण्याचे निर्णय.

Aug 26, 2026
वर्षभरात तब्बल 683 लाचखोर अडकले `एसीबी`च्या जाळ्यात

वर्षभरात तब्बल 683 लाचखोर अडकले `एसीबी`च्या जाळ्यात

Bribery ACB Action: र्षभरात लाचखोरीबाबत ४७५ गुन्हे दाखल करण्यात आले असून या गुन्ह्यात ६८३ लाचखोर अडकले आहेत. यात ५१ `क्लास वन` तसेच ८५ `क्लास टू` अधिकार्‍यांचा समावेश आहे.

Aug 25, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेनिक लोढा यांच्या मार्गदर्शनाने पोलीस पाटलांमध्ये नवा आत्मविश्वास  

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेनिक लोढा यांच्या मार्गदर्शनाने पोलीस पाटलांमध्ये नवा आत्मविश्वास  

Hingoli Police Patil: जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेनिक लोढा यांनी पोलीस पाटील यांच्या कार्याला अधिक बळ देण्यासाठी थेट संवाद साधत मोलाचे मार्गदर्शन केले. गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखणे ही पोलीस..

Aug 20, 2026
'अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम-2': आकडेवारीत हिंगोली पिछाडीवर, मोहिमेच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह  

'अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम-2': आकडेवारीत हिंगोली पिछाडीवर, मोहिमेच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह  

Illegal Businesses Campaign: नांदेड परिक्षेत्रात 1 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत राबविलेल्या अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम-2 अंतर्गत हिंगोली जिल्हा पोलिसांची कामगिरी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत..

Aug 17, 2026