अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम

'अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम-2': आकडेवारीत हिंगोली पिछाडीवर, मोहिमेच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह  

Illegal Businesses Campaign: नांदेड परिक्षेत्रात 1 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत राबविलेल्या अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम-2 अंतर्गत हिंगोली जिल्हा पोलिसांची कामगिरी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत..

'अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम-2': आकडेवारीत हिंगोली पिछाडीवर, मोहिमेच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह  

Illegal Businesses Campaign

हिंगोली (Illegal Businesses Campaign) : नांदेड परिक्षेत्रात 1 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत राबविलेल्या "अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम-2" अंतर्गत हिंगोली जिल्हा पोलिसांची कामगिरी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अत्यंत संथ असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. या पंधरवड्यात हिंगोलीत 187 गुन्हे दाखल करून 235 आरोपींवर कारवाई करण्यात आली असून अवघा 67 लाख 91 हजार 578 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  

पोलिस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेत हिंगोलीत सर्वाधिक 118 गुन्हे अवैध दारू प्रकरणात नोंदविले गेले. त्यात 119 आरोपींवर कारवाई करून 7 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त झाला. मटका-जुगाराचे 35 गुन्हे, 80 आरोपी आणि 4 लाख 98 हजारांचा मुद्देमाल, तर शस्त्र अधिनियमाचे 6 गुन्हे आणि गुटख्याचे केवळ 2 गुन्हे नोंदविले गेले. इतर प्रकरणात 26 गुन्हे दाखल करून 54 लाख 8 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

परंतु हीच आकडेवारी जेव्हा नांदेड, परभणी आणि लातूरच्या तुलनेत पाहतो तेव्हा हिंगोलीची कामगिरी फिकी पडते. नांदेड जिल्ह्यात याच कालावधीत 3 कोटी 83 लाख 49 हजार, परभणीत 1 कोटी 2 लाख 72 हजार आणि लातूरमध्ये 41 लाख 97 हजारांचा मुद्देमाल जप्त झाला. म्हणजे हिंगोलीचा जप्त मुद्देमाल हा नांदेडच्या सहाव्या आणि परभणीच्या पंधराव्या हिस्स्या एवढाच आहे. गुटखा विरोधात नांदेडमध्ये 9, परभणीत 4 आणि लातूरमध्ये 3 गुन्हे झाले असताना हिंगोलीत केवळ 2 गुन्हे दाखल झाले. शस्त्र प्रकरणातही हिंगोली 6 गुन्ह्यांसह सर्वात मागे आहे.
 
ही (Illegal Businesses Campaign) आकडेवारी हिंगोली पोलिसांच्या मोहिमेची व्याप्ती आणि गांभीर्यावर थेट प्रश्न उपस्थित करते. दारूचे 118 गुन्हे असूनही मुद्देमाल अत्यल्प असणे, गुटखा आणि शस्त्र प्रकरणात नगण्य कारवाई होणे, यावरून जिल्ह्यातील मोठ्या रॅकेटपर्यंत पोलिसांचा हात पोहोचत नसल्याचे दिसते. मोहिमेच्या नावाखाली केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून आकडेवारी वाढविण्याचा प्रयत्न होतोय का, अशी शंका यामुळे बळावली आहे. नांदेड परिक्षेत्रात एकूण 8 कोटींचा मुद्देमाल जप्त झाला असताना त्यात हिंगोलीचा वाटा अवघा 8 टक्के आहे. त्यामुळे मोहिम खऱ्या अर्थाने यशस्वी करायची असेल तर हिंगोली पोलिसांनी रणनीती बदलून मोठ्या अवैध धंदेवाल्यांवर थेट कारवाई करणे गरजेचे आहे, अन्यथा ही मोहिम केवळ कागदावरच राहण्याची शक्यता आहे.

संबंधित सामग्री

अवैध व्यवसाय निर्मुलन मोहिमेत जिल्ह्यात शस्त्र अधिनियम अंतर्गत एकमेव गुन्हा दाखल

अवैध व्यवसाय निर्मुलन मोहिमेत जिल्ह्यात शस्त्र अधिनियम अंतर्गत एकमेव गुन्हा दाखल

Illegal Businesses Campaign: नांदेड परिक्षेत्रात पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली १ ते ३० सप्टेंबर दरम्यान अवैध व्यवसाय निर्मूलन मोहीम-३ राबवली जात आहे.

Sep 09, 2026
हिंगोलीत 'अवैध व्यवसाय निर्मूलन' च्या नावाखाली छोट्यांवर कारवाई, मोठे मासे सुटले  

हिंगोलीत 'अवैध व्यवसाय निर्मूलन' च्या नावाखाली छोट्यांवर कारवाई, मोठे मासे सुटले  

Illegal Businesses Eradication: नांदेड परिक्षेत्र पोलीस उप महानिरीक्षकांच्या आदेशा नुसार सुरू असलेल्या अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम-2 अंतर्गत हिंगोली 82 गुन्हे दाखल करून 88 जणांविरुद्ध कारवाई

Aug 09, 2026
गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात हिंगोलीची स्थानिक गुन्हे शाखा अपयशी

गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात हिंगोलीची स्थानिक गुन्हे शाखा अपयशी

Hingoli Local Crime Branch: हिंगोलीत अनेक गम्भीर चोरकृत्यांचा मजकूर असून, त्याचा संपूर्ण तपासणी करण्याच्या प्रयत्नात स्थानिक पोलिस शाखाने अपयशी ठरली आहे.

Aug 03, 2026