Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली पोलिस पाटिल

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेनिक लोढा यांच्या मार्गदर्शनाने पोलीस पाटलांमध्ये नवा आत्मविश्वास

Hingoli Police Patil: जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेनिक लोढा यांनी पोलीस पाटील यांच्या कार्याला अधिक बळ देण्यासाठी थेट संवाद साधत मोलाचे मार्गदर्शन केले. गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखणे ही पोलीस..


जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ श्रेनिक लोढा यांच्या मार्गदर्शनाने पोलीस पाटलांमध्ये नवा आत्मविश्वास  

Hingoli Police Patil |

 

समन्वय आणि संवादातून प्रशासन-पोलीस पाटील नाते अधिक दृढ

हिंगोली (Hingoli Police Patil) : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेनिक लोढा यांनी पोलीस पाटील यांच्या कार्याला अधिक बळ देण्यासाठी थेट संवाद साधत मोलाचे मार्गदर्शन केले. गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखणे ही पोलीस पाटील यांची प्रमुख जबाबदारी असून, ती जबाबदारी अधिक सक्षमपणे पार पाडण्यासाठी त्यांनी आवश्यक सूचना आणि माहिती दिली.

 डॉ. लोढा यांनी या बैठकीत पोलीस पाटील यांच्या दैनंदिन कामकाजातील अडचणी, समस्या आणि विविध विषय समजून घेतले. प्रशासन आणि पोलीस पाटील यांच्यातील योग्य समन्वय, संवाद आणि सहकार्य ही आजच्या काळाची गरज आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या या प्रत्यक्ष संवादामुळे पोलीस पाटील बांधवांमध्ये प्रशासनाबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

विशेषतः पोलीस पाटील (Hingoli Police Patil) यांच्या निलंबना संदर्भातील विषयात पोलीस अधीक्षक लोढा यांनी सकारात्मक भूमिका घेऊन योग्य विचारांती कार्यवाही मागे घेण्यासाठी प्रयत्न केले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांच्यात समाधानाचे वातावरण आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांच्या वतीने या संवेदनशील आणि लोकाभिमुख निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

यावेळी पोलीस पाटील यांनीही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. लोढा यांना शब्द दिला की, त्यांच्यावर सोपविलेल्या कर्तव्यांची आणि जबाबदाऱ्यांची पूर्ण जाणीव ठेवून ते प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि जबाबदारीने काम करतील. गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, प्रशासनाला वेळेवर आवश्यक माहिती देणे, सामाजिक सलोखा व शांतता टिकवून ठेवणे आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करणे ही जबाबदारी यापुढे अधिक ताकदीने पार पाडली जाईल, असे त्यांनी सांगितले.

मा. डॉ. श्रेनिक लोढा यांच्या या मार्गदर्शनामुळे (Hingoli Police Patil) पोलीस पाटील यांना नवी ऊर्जा, आत्मविश्वास आणि काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. भविष्यातही त्यांचे असेच मार्गदर्शन आणि सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा सर्व पोलीस पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस पाटील उपस्थित होते.