हिंगोली अवैध दारूविक्री

हिंगोली जिल्ह्यात अवैध दारूविक्रीवर उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; १.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Hingoli illegal liquor sale: हिंगोली जिल्ह्यातील एक विशेष कारवाईत अवैध दारूविक्री आणि वाहतूक विरोधात १.६५ लाख रुपये किमतीचे माल जप्त करण्यात आले. विभागाने १८० मिलीच्या बाटल्या,

हिंगोली जिल्ह्यात अवैध दारूविक्रीवर उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; १.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Hingoli illegal liquor sale

हिंगोली (Hingoli illegal liquor sale) : राज्य उत्पादन शुल्क हिंगोली विभागाने २३ ते २५ मे २०२६ या कालावधीत जिल्हाभरात अवैध दारूविक्री आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत निरीक्षक मोहन मातकर, भरारी पथक निरीक्षक रमेश चाटे, दुय्यम निरीक्षक हिंगोली बिट क्र. १, २, ३ यांच्या पथकाने औंढा तालुका व परिसरात अवैध मध्य विक्री व वाहतुकीविरोधात छापे टाकले. या (Hingoli illegal liquor sale) कारवाईत एकूण २१ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले. 

कारवाईदरम्यान देशी मद्याच्या १८० मिलीच्या ४८५ बाटल्या, ११.५० लिटर हातभट्टी दारू आणि २ दुचाकी वाहने असा एकूण १ लाख ६५ हजार ५३० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मोहिमेत दुय्यम निरीक्षक टी. बी. शेख, कृष्णकांत पुरी, प्रदीप गोणारकर, ज्योती गुट्टे यांच्यासह स. दु. नि. कांबळे, जवान आडे, राठोड, चव्हान, दिनेश राठोड, टेके, वाहनचालक वाघमारे व इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. जिल्ह्यात (Hingoli illegal liquor sale) अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई सुरू राहील, असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात भर दिवसा चोरी

हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात भर दिवसा चोरी

Hingoli District and Sessions Court: जिल्ह्यात चोर्‍यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आता तर चोरट्यांना पोलिसांचे भय वाटेनासे झाले आहे. हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात चोरी

Sep 30, 2026
हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त यादीत; बारा उपाययोजना आणि सवलती लागू

हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त यादीत; बारा उपाययोजना आणि सवलती लागू

Hingoli District Drought: राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून या तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी बारा उपाययोजना व सवलती लागू

Sep 27, 2026
जिल्हा दुष्काळाच्या चक्रात; घोषणेची प्रतीक्षा, ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबरमध्येही पावसाची दीर्घ दडी

जिल्हा दुष्काळाच्या चक्रात; घोषणेची प्रतीक्षा, ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबरमध्येही पावसाची दीर्घ दडी

Hingoli District Drought: एल निनो'चा इशारा आणि अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत पावसाने गाठलेली सरासरी या फेऱ्यात जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस व तूर

Sep 24, 2026
हिंगोलीत गणेशोत्सवात श्रींच्या स्थापनेत वाढ; ‘एक गाव, एक गणपती’ची संख्या मात्र घटली

हिंगोलीत गणेशोत्सवात श्रींच्या स्थापनेत वाढ; ‘एक गाव, एक गणपती’ची संख्या मात्र घटली

हिंगोलीत यंदा १७१० ठिकाणी गणेश स्थापना झाली; मात्र ‘एक गाव एक गणपती’ची संख्या ३०५ वरून १९१ वर घटल्याने चिंता व्यक्त होत आहे.

Sep 15, 2026