Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > करीअर

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ परीक्षा

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेवर 'एआय सीसीटीव्ही'ची नजर

YCMOU Exam: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ २०२६ उन्हाळी परीक्षा AI आधारित सीसीटीवी कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली करणार आहे.


यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेवर एआय सीसीटीव्हीची नजर

YCMOU Exam |

 

८० हजारांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा

नांदेड (YCMOU Exam) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (YCMOU) वतीने घेण्यात येणाऱ्या उन्हाळी २०२६ च्या पदवी, पदव्युत्तर पदवी आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या परीक्षा यंदा एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली प्रायोगिक तत्वावर पार पडणार आहेत. परीक्षा संपूर्णपणे कॉपीमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात व्हाव्यात यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या नियोजनानुसार तसेच विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी गोविंद कतलाकुटे व परीक्षा नियंत्रक डॉ. भटूप्रसाद पाटील यांच्या विशेष निगराणीखाली विद्यापीठ प्रशासनाने हे अद्ययावत पाऊल उचलले आहे.

​यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक (YCMOU Exam) येथील मुख्य नियंत्रण कक्ष व नांदेड विभागीय केंद्रातून प्रत्येक वर्गातील संशयास्पद हालचाली, गैरप्रकार, प्रश्नपत्रिका डाउनलोड करणे अथवा उत्तरपुस्तिका सील करणे या सर्वांवर थेट नजर ठेवली जाणार आहे. नांदेड विभागीय केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व परीक्षा केंद्रांवर विशेष उपाययोजना करण्यात आल्याची माहिती नांदेड विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. यशवंत कलेपवार यांनी दिली.

​मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी प्रमाणपत्र परीक्षेला (YCMOU Exam) दि. २१ मे पासून सुरुवात झाली असून, पदवी व पदव्युत्तर पदवी परीक्षेला दिनांक २७ मे पासून नांदेड, हिंगोली, लातूर आणि परभणी या चार जिल्ह्यांतील ८७ परीक्षा केंद्रांवर सुरुवात होत आहे. यामध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे एकूण ८० हजार ४२० परीक्षार्थी सहभागी होणार आहेत. परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी विद्यापीठाच्या वतीने ८७ बहिस्थ पर्यवेक्षक (बैठे पथक) तसेच ११ दक्षता पथकांची स्थापना करून त्यात एकूण ३८ अनुभवी प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक परीक्षा प्रक्रियेवर विशेष लक्ष ठेवणार आहे.

तसेच परीक्षा काळात कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी संबंधित लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली या चारही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांकडे चोख पोलीस बंदोबस्ताची मागणी विभागीय केंद्राच्या वतीने करण्यात आली आहे. एआय सीसीटीव्हीच्या निगराणीत, दक्षता पथकांच्या देखरेखीखाली आणि कडक शिस्तीत या परीक्षा पार पडणार असल्याने यंदाची परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कॉपीमुक्त ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

Related to this topic: