Maharashtra Police Force: हिंगोलीतील सेवासदन वसतीगृहातील आकाश इंगोले याची महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल पदावर निवड झाली आहे. याची तयारी आणि संघर्षाची कथा.
आई वडिलांचे छत्र अगदी लहानपणीच हरवल्यानंतर आत्मविश्वासाने शिक्षण घेतले!
हिंगोली (Maharashtra Police Force) : येथील सेवासदन वसतीगृहातील मुलगा आकाश गणेश इंगोले याची महाराष्ट्र पोलीसमध्ये पोलीस कॉन्स्टेबल या पदावर निवड झाली आहे. सेवासदनचे हे दुसरे लेकरू महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police Force) मध्ये लागले आहे. या अगोदर प्रकाश वायचाळ हा सर असं कधीच मुलगा नागपूर येथे महाराष्ट्र पोलीस मध्ये लागला आहे.
आई-वडिलांचे छत्र अगदी लहानपणी गेल्यानंतर मागील सात वर्षापासून आकाश आणि अविनाश ही दोन भावंडे सेवासदनमध्ये शिक्षण घेत होते. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी आकाशने केली आणि त्याची महाराष्ट्र पोलीस मध्ये निवड झाली. संपूर्ण सेवासदन परिवाराला तसेच सेवासदन परिवाराशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीला या गोष्टीचा खूप आनंद झाला आहे.
सेवासदन हे वसतिगृह मागील सात वर्षापासून जिजामाता नगर हिंगोली या ठिकाणी अनेक निराधार लेखन आधार देत आहे. या वसतिगृहातील तीन मुले डॉक्टर होत आहेत 13 मुले इंजीनियरिंग करत आहेत. तसेच दोन मुले महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत. इतर मुले बँकिंग ,हॉटेल मॅनेजमेंट मेडिकल इत्यादी क्षेत्रात अतिशय उत्तम प्रकारे शिक्षण घेत आहेत.
काही मुले चांगल्या कंपनीमध्ये आणि बँकांमध्ये कार्यरत आहेत. समाजसेवेचा वसा स्वीकारून नि:स्वार्थपणे कार्य करणारे धनराज कदम आणि मीरा कदम हे समाजासाठी खरोखरच आदर्श आहेत. आज स्वतःच्या दोन लेकरांना वाढवणे त्यांना शिक्षण देणे , मुलांना संस्कार देणे या गोष्टी कठीण झालेल्या असताना मीरा कदम या मात्र या सर्व लेकरांची आई झाल्या आहेत.
मीरा कदम आणि धनराज कदम स्वतःच्या लेकराप्रमाणे या मुलांचा सांभाळ करतात. वेळोवेळी या मुलांना मार्गदर्शन करतात आधार देतात. आत्मविश्वास देतात. शेतकरी शेतमजुरांच्या निराधार मुलांनी शिक्षण घेऊन स्वतःचे भविष्य उज्वल करावे आणि त्यानंतर समाजाकडे संवेदनशीलतेने पहावे हीच आमची इच्छा आहे असे मत मीरा कदम यांनी व्यक्त केले! आकाश महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police Force) मध्ये आपले जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेल याची मला खात्री आहे असे मत धनराज कदम यांनी व्यक्त केले. सर्व स्तरातून आकाश इंगोले याचे आणि सेवासदन परिवाराचे कौतुक होत आहे.
सेवासदनच्या भक्कम आधारामुळे मी हे यश मिळवू शकलो. मीराई आणि धनराज बाबा हेच माझे आई-वडील झाले आणि मला त्यांनी आत्मविश्वास दिला. यापुढेही मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत राहील आणि याहीपेक्षा मोठे यश मिळविन.
-आकाश इंगोले