Rape Case

अकोल्यात पोलिस कर्मचाऱ्यावर अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचा आरोप; पीडितेची आत्महत्येचा प्रयत्नानंतर प्रकृती गंभीर

अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे एका पोलिस कर्मचाऱ्यावर त्याच घरातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

अकोल्यात पोलिस कर्मचाऱ्यावर अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचा आरोप; पीडितेची आत्महत्येचा प्रयत्नानंतर प्रकृती गंभीर

आरोपी पोलिस कर्मचारी फरार; अटकेच्या मागणीसाठी नातेवाईक व ग्रामस्थांचे पोलिस उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे एका पोलिस कर्मचाऱ्यावर त्याच घरातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर संबंधित मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तिची प्रकृती अत्यंत गंभीर असून ती सध्या कोमामध्ये उपचार घेत आहे. या प्रकरणामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून आरोपीला तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांसह ग्रामस्थांनी पोलिस उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पोलिस कर्मचारी पवन वडगावे हा बाळापूर येथे भाड्याच्या घरात राहत होता. त्याच घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर त्याने अत्याचार केल्याचा आरोप आहे. लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचेही बोलले जात आहे. या घटनेनंतर मानसिक धक्का बसलेल्या पीडित मुलीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले; मात्र तिची प्रकृती चिंताजनक असून ती कोमात असल्याची माहिती आहे.

या प्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यानंतरपासून आरोपी पोलिस कर्मचारी फरार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, तो याच पोलिस ठाण्यात कार्यरत असल्याने स्थानिक पोलिसांनी त्याला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून वरिष्ठ पातळीवरील यंत्रणेकडे सोपविण्याची मागणीही करण्यात येत आहे.

घटनेच्या निषेधार्थ पीडित मुलीचे नातेवाईक, शेडको समाज बांधव आणि ग्रामस्थांनी पोलिस उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आरोपी पवन वडगावे याला तातडीने अटक करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

दरम्यान, आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर पीडित तरुणी मृत्यूशी झुंज देत असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अद्याप आरोपीला अटक न झाल्याने संबंधित ठाणेदार तसेच आरोपीला मदत करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

संबंधित सामग्री

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा स्थगित झाला असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Oct 07, 2026
डोंगरकडा फाटा येथे एक तास रास्तारोको आंदोलन

डोंगरकडा फाटा येथे एक तास रास्तारोको आंदोलन

Dongarkada Rastaroko Andolan: महाराष्ट्र शासनाने दुष्काळ जाहीर केल्या नंतर प्रशासनाने पंचनामे करत असल्याने दि 6 ऑक्टोबर रोजी डोंगरकडा फाटा येथे नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग रास्तारोको आंदोलन..

Oct 06, 2026