डोंगरकडा रास्तारोको आंदोलन

डोंगरकडा फाटा येथे एक तास रास्तारोको आंदोलन

Dongarkada Rastaroko Andolan: महाराष्ट्र शासनाने दुष्काळ जाहीर केल्या नंतर प्रशासनाने पंचनामे करत असल्याने दि 6 ऑक्टोबर रोजी डोंगरकडा फाटा येथे नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग रास्तारोको आंदोलन..

डोंगरकडा फाटा येथे एक तास रास्तारोको आंदोलन

Dongarkada Rastaroko Andolan

 

इ के वाय सी साठी पैसे घेणाऱ्या महसूल अधिकारी यांची बदली 
शेतकऱ्यांना पंचनामे न करता सरसकट मदत द्या!

डोंगरकडा (Dongarkada Rastaroko Andolan) : महाराष्ट्र शासनाने दुष्काळ जाहीर केल्या नंतर प्रशासनाने पंचनामे करत असल्याने दि 6 ऑक्टोबर रोजी डोंगरकडा फाटा येथे नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग एक तास रास्तारोको आंदोलनात मुंडन करून निषेध व्यक्त केला.

राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांना सरसकट मदत देणार आहोत तरीही प्रशासन मात्र पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांची थट्टा करत आहे म्हणून डोंगरकडा येथील शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकीने, राजेगोरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पराग अडकीने, माजी सरपंच आमदार संतोष बांगर यांचे कट्टर समर्थक पप्पू अडकीने, स्वाभिमानी मराठा संघटनेचे बाळासाहेब नरवाडे आदी शेकडो शेतकऱ्यांनी नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एक तास रास्तारोको आंदोलन करत अधिकारी यांच्या मार्फत आपल्या भावना शासनाला कळविण्यात आल्या आहेत.

डोंगरकडा येथे महसूल अधिकारी हे आपल्या रोजगार यांच्यामार्फत शेतकऱ्यां कडून पैशाची मागणी करत असल्याचा आरोप सुद्धा होत असल्याने तालुका प्रशासनाने त्यांची तात्काळ बदली करून शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, या आंदोलनात एका शेतकऱ्याने मुंडन आंदोलन केले आहे.