बाबा बागेश्वर निषेध

कुरुंदा येथे शिवप्रेमींकडून बाबा बागेश्वर यांचा तीव्र निषेध, प्रतिमेचे दहन

Baba Bageshwar protest: कुरुंदा येथे शिवप्रेमींनी बाबा बागेश्वर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी त्यांच्या प्रतिमेचे दहन केले. शिवाजी महाराज व इतर संतांच्या अवमानावर संताप व्यक्त केला.

कुरुंदा येथे शिवप्रेमींकडून बाबा बागेश्वर यांचा तीव्र निषेध, प्रतिमेचे दहन

Baba Bageshwar protest

कुरुंदा (Baba Bageshwar protest) : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ कुरुंदा येथे 26 एप्रिल ला रात्रीच्या सुमारास शिवप्रेमींनी बाबा बागेश्वर यांच्या प्रतिमेला जोडे मारून दहन केले व जोरदार निदर्शने केली. छत्रपती संभाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात “बागेश्वर महाराजांचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय” अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना शिवप्रेमी अलोक इंगोले पाटील म्हणाले, “यापुढे महाराष्ट्रात कोणत्याही महापुरुषांविरोधात अपशब्द खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा आम्ही शासनाला देत आहोत.”

“शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडे दिला” या बाबा बागेश्वर (Baba Bageshwar protest) यांच्या विधानावर संताप व्यक्त करत इंगोले म्हणाले, “यापूर्वीही या भोंदूने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जगद्गुरू संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली व संपूर्ण संत परंपरेवर गरळ ओकली आहे. वारंवार अशी वक्तव्ये करून छत्रपतींचा इतिहास, संत परंपरा आणि फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार बदनाम करण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशी शंका येते.”

बागेश्वर (Baba Bageshwar protest) यांचे वक्तव्य सुरू असताना व्यासपीठावर राज्यकर्तेही उपस्थित होते, याबद्दल खंत व्यक्त करण्यात आली. “शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी. हा भोंदू यापुढे महाराष्ट्रात दिसता कामा नये, अन्यथा सरकारलाही ते महागात पडेल,” असा इशारा आंदोलकांनी दिला. सरकार कारवाई करणार नाही, अशी शक्यता व्यक्त करत “आता सहन करून दुर्लक्ष करायचे की धडा शिकवायचा, हे शिवप्रेमी जनतेने ठरवावे” असे आवाहनही करण्यात आले. या निषेध आंदोलनाला शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा स्थगित झाला असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Oct 07, 2026
डोंगरकडा फाटा येथे एक तास रास्तारोको आंदोलन

डोंगरकडा फाटा येथे एक तास रास्तारोको आंदोलन

Dongarkada Rastaroko Andolan: महाराष्ट्र शासनाने दुष्काळ जाहीर केल्या नंतर प्रशासनाने पंचनामे करत असल्याने दि 6 ऑक्टोबर रोजी डोंगरकडा फाटा येथे नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग रास्तारोको आंदोलन..

Oct 06, 2026