औंढा नागनाथ (Shiradshahapur Illegal sand) : तहसील कार्यालयाच्या महसूल पथकाने ६ सप्टेंबर रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथील बसस्थानकाच्या जवळ अवैध रेतीचे ट्रॅक्टर पकडले. ६ लाख ५ हजार २५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून ट्रॅक्टर चालक- मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी मिळालेल्या गुप्त माहितीवरून तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी अर्चना पटवे, सुजाता गायकवाड, तलाठी केशव जगताप, सुरेश दुबे, बांगर, मुंडे यांच्या पथकाने कारवाई केली व ट्रॅक्टर वाहन औंढा नागनाथ पोलीस ठाणे येथे आणून लावण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस, पोलीस कॉन्स्टेबल ओंकारेश्वर रांजणेकर यांनी पंचनामा केला.
मंडळ अधिकारी सुजाता गायकवाड यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक पवन सुरेश खूणे राहणार नालेगाव, नितीन उर्फ पिंटू प्रल्हाद खेबाळे रा. शिरड शहापूर यांच्यावर ६ सप्टेंबर रोजी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Shiradshahapur Illegal sand) गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस करत आहेत.