Breaking News
  • दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
  • लखलख चमकणारा महाराष्ट्राचा एकमेव काचेचा गणपती पुण्यात!
  • धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम
  • मराठा बांधवांचा मुंबईकडे ‘गनिमी कावा’; धाराशिवमधून 5 हजार कार्यकर्ते जाणार
  • शिरूरमध्ये कांदा लागवडीला वेग; महिलांनी पावसासाठी घातले साकडे
  • मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम; सात लाख मराठा बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था
  • सुरगाणा तालुक्यातील शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी मशीन दाखल
  • अनेकांना कुणबी प्रमाणपत्र दिले - एकनाथ शिंदे
  • नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर शहर कडकडीत बंद

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

Illegal Sand Mining

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

निलंगा तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; दोन ट्रॅक्टर-ट्रॉलींसह ७०० ब्रास वाळू आणि ४५.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त.


अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

दोन ट्रॅक्टर-ट्रॉलींसह ७०० ब्रास वाळू; ४५ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

निलंगा : मांजरा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूचा उपसा करून विनापरवाना साठवणूक व वाहतूक केल्याप्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या कारवाईत दोन ट्रॅक्टर-ट्रॉलींसह सुमारे ७०० ब्रास वाळू असा एकूण ४५ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास निलंगा तालुक्यातील शिरोळ येथील वेताळवाडी वस्ती परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सूर्यकांत ज्ञानोबा जाधव आणि दयानंद किशन कज्जेवाड, दोघेही रा. शिरोळ, ता. निलंगा, जि. लातूर, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान सूर्यकांत जाधव यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास वाळू आढळली. या मुद्देमालाची किंमत सुमारे ५ लाख ५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले. तसेच दयानंद कज्जेवाड यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये अंदाजे अर्धा ब्रास वाळू आढळून आली असून, तिची किंमत सुमारे ५ लाख २ हजार ५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.

याशिवाय वेताळवाडी वस्ती येथील शाळेजवळील तळ्याच्या परिसरात अवैधरीत्या उपसा करून साठवून ठेवलेली अंदाजे ७०० ब्रास वाळू पोलिसांना आढळून आली. या वाळूची किंमत सुमारे ३५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ४८(७) व ४८(८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस नाईक श्रीराम वामणराव सांडुर यांनी फिर्याद दिली. दाखल अंमलदार म्हणून सफौ बरूरे यांनी काम पाहिले असून, पोलीस उपनिरीक्षक यू. जी. रायबोळे पुढील तपास करीत आहेत.

Related to this topic: