लातूर अवैध वाळू

वाळू साठा जप्त, कोणाचा ते कळेना!

Latur illegal sand: अवैध वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेने घणाघात करीत औराद परिसरात तेरणा नदीलगतच्या शेतातून तब्बल ५ लाखांची (१०० ब्रास) वाळू जप्त केली. गुरुवारी दुपारी आणि गुन्हे शाखा

वाळू साठा जप्त, कोणाचा ते कळेना!

Latur illegal sand

 

आहे किनई कमाल! 'एलसीबी' अन् 'महसूल'ची धमाल

लातूर (Latur illegal sand) : अवैध वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेने घणाघात करीत औराद परिसरात तेरणा नदीलगतच्या शेतातून तब्बल ५ लाखांची (१०० ब्रास) वाळू जप्त केली. गुरुवारी दुपारी आणि गुन्हे शाखा आणि महसूल विभागाच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली खरी, मात्र वाळू साठा करून ठेवण्याचा प्रताप कोण केला? याचा शोध पोलीस व महसूल प्रशासनाला काही लागला नाही, हे विशेष.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला औराद शहाजानी परिसरातील तेरणा नदीपात्रातून (Latur illegal sand) अवैधरित्या वाळू उपसा करून ती लगतच्या शेतात विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. ती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुरुवारी (दिनांक १० सप्टेंबर) भर दुपारी  ३ वाजता महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन संबंधित ठिकाणी पोहोचले आणि छापा टाकून वाळू साठा जप्त केला. मात्र हा वाळूसाठा कोणी व कोणत्या उद्देशाने अवैधरित्या उपसा करून साठवून ठेवला? याचा उलगडा या कारवाईत एलसीबी व महसूल या दोन्ही विभागाच्या पथकाला झाला नाही.

अर्धवट कारवाईतून आळा बसेल का?

पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार संजय कांबळे, रामलिंग शिंदे, सूर्यकांत कलमे, पाराजी पुठ्ठेवाड, तुळशीराम बरुरे तसेच महसूल विभागाचे नायब तहसीलदार प्रवीण आळंदकर व तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) शुभम वाघमारे, औराद शहाजानी यांच्या संयुक्त पथकाने एक कामगिरी केली, मात्र साठा कोण ठेवला? हे या पथकाला समजू शकले नाही. लातूर जिल्ह्यात नैसर्गिक साधनसंपत्तीचे (Latur illegal sand) अवैध उत्खनन, वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध पोलीस व महसूल विभागाकडून संयुक्तपणे कारवाई करण्यात येत आहे. मात्र अशा अर्धवट कारवाईतून अशा प्रकारच्या अवैध व्यवसायाला आळा कसा बसेल? साठा करणारा एलसीबी आणि महसूल विभागाच्या 'तीक्ष्ण' नजरेतून कसा निसटला असेल? याची खमंग चर्चा तेरणाकाठी होत आहे.

टैग्स: Latur illegal sand