Adv. Najer Kaji: हिंगोलीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक संवाद दौरात युवकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे आवाहन केले गेले. विविध कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविण्यात आली.
Adv. Najer Kaji |
हिंगोली (Adv. Najer Kaji) : ४ एप्रिल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने प्रदेशआध्यक्ष ॲड. नाजेर काझी (Adv. Najer Kaji) यांच्या नेतृत्वाखाली आयोजित राज्यव्यापी अल्पसंख्याक संवाद दौरा हिंगोली येथे उत्साहात पार पडला. या संवाद दौऱ्याचा मुख्य उद्देश अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेणे तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हा होता.
कार्यक्रमात शिक्षण, रोजगार, सामाजिक विकास, तसेच युवकांसाठीच्या संधी यासारख्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी उपाध्यक्ष निहाल भैया, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आसद कादरी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. सतीश पाचपुते, नगरसेवक शकील भाई, आमेर अली, बासिद मौलाना खयुम खा पठाण, मुजीब कुरेशी, माजी नगरसेवक जावेद राज, अब्दुला पठाण, आयुब भाई, फिरोज लाला, आवेस पठान, अजर इमानदार, आतिक पुसेगावकर, जावेद ईनामदार, शेख इलियास, माजीद इनामदार, आश्रफ अली आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटना मजबूत करण्याचे, युवकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे तसेच शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांनीही आपल्या स्थानिक समस्या मांडत विविध सूचना केल्या. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन हाजी सय्यद अमजदुल्ला कादरी यांनी केले.