Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

वसमत खंजर प्रकरण

वसमत शहरात खंजर बाळगणाऱ्या दोघांना अटक

Wasmat Dagger Case


वसमत शहरात खंजर बाळगणाऱ्या दोघांना अटक

Wasmat Dagger Case |

हिंगोली (Wasmat Dagger Case) : जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर मोहीम उघडली आहे. या मोहिमेदरम्यान वसमत शहरात खंजर बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वसमत शहरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे कारखाना रोड, वसमत येथील रहिवासी शैलेश रोहिदास राऊत आणि कोंडीबा बालाजी क्षीरसागर या दोघांना हिरो शोरूम जवळ ताब्यात घेण्यात आले. अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे धारदार व घातक खंजर आढळून आले. दोन्ही आरोपींना जागीच पकडून वसमत शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणीही अवैध हत्यार बाळगू नये, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक हिंगोली, कमलेश मीना, अप्पर पोलीस अधीक्षक हिंगोली व मोहन भोसले, पोलीस निरीक्षक स्थागुशा यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार शिवाजी जालमिरे, आकाश टापरे, ज्ञानेश्वर गोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.