Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

वाजेगाव स्फोटक घटना

वाजेगाव स्फोटकाच्या घटनेची एनआयए मार्फत चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी

Wajegaon Explosive Case: नांदेडमध्ये रमजान ईदच्या दिवशी वाजेगाव येथे दुचाकीचा स्फोट झाला. काँग्रेसने एनआयए मार्फत उच्च स्तरीय चौकशीची मागणी केली.


वाजेगाव स्फोटकाच्या घटनेची एनआयए मार्फत चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी 

Wajegaon Explosive Case |

नांदेड (Wajegaon Explosive Case) : रमजान ईदच्या दिवशी वाजेगाव येथील ईदगाह परिसरात धावत्या दुचाकीचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर जनतेतून अनेक शंका उपस्थित होत आहेत. याकरिता सदर स्फोटाची एनआयए या संस्थेच्या माध्यमातून उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी खा. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेस शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. दरम्यान या घटनेच्या तपासाबदल पोलीस प्रशासनाने प्रसारमाध्यमातून माहिती द्यावी अशी देखील मागणी करण्यात आली.

नांदेड शहरानजिक असलेल्या वाजेगाव ईदगाह परिसरात रमजान ईदच्या दिवशी धावत्या दुचाकीचा स्फोट (Wajegaon Explosive Case) झाल्याची घटना घडली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. रमजान ईदच्या दिवशी ईदगाह मैदानावर नमाज असताना हा स्फोट झाल्यामुळे या स्फोटामागे काही घातपात करण्याचा कट होता का असा संशय व्यक्त होत आहे. त्यात पोलीस प्रशासनाकडून सदर घटनेबाबत समाधानकारक माहिती अद्याप बाहेर आली नसल्याने अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे, असे सांगत सदर घटनेची एनआयए मार्फत चौकशी करावी तसेच पोलीस प्रशासनाकडून माहिती देण्यात यावी, अशी मागणी खा. रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेस शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्यासह अप्पर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, सुरेंद्र घोडसकर, डॉ. श्रावण रँपनवाड, रामदास पाटील सुमठाणकर, एकनाथ मोरे, आनंद चव्हाण, डॉ. रेखा चव्हाण, अब्दुल गफार, बाबुभाई खोकेवाले, मुन्ना अब्बास, शेर अली, विठ्ठल पावडे, फारुख अली, काजी नाफे, सय्यद शोएब, सत्यपाल सावंत, अजिज कुरेशी, बापूसाहेब पाटील, मोहसीन खान, मोहम्मद इब्राहिम, कुमार कुर्तडीकर, ज्योती कदम, अंबादास रातोळे, डॉ. वाशी, बाळासाहेब देशमुख, अझर शेख, प्रकाश दिपके आदीसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related to this topic: