Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

विद्या शक्ती शिक्षण संस्था

विद्या शक्ती शिक्षण संस्थेवर कारवाईच्या हालचाली

Vidya Shakti Education Institute: सेनगाव येथील विद्यानिकेतन प्राथमिक शाळा फक्त कागदोपत्री असून, प्रत्यक्षात शाळा अस्तित्वात नाही. शासनाकडून लाटलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अनुदानाची चौकशी सुरु.


विद्या शक्ती शिक्षण संस्थेवर कारवाईच्या हालचाली

Vidya Shakti Education Institute |

आ. तान्हाजी मुटकुळेंनी विधान सभेत केला प्रश्न उपस्थित
५ कोटी रुपये अनुदान लाटल्याचा आरोप
उप संचालकांचीमंत्रालयातून आठ दिवसांची डेडलाईल

हिंगोली (Vidya Shakti Education Institute) : जिल्ह्यातील सेनगाव येथे कागदावर शाळा दाखवून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 'विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ, कोळसा' (Vidya Shakti Education Institute) संचलित विद्यानिकेतन प्राथमिक शाळा (अनुदानित) प्रत्यक्षात अस्तित्वातच नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी योग्य ती तात्काळ कार्यवाही करून त्याचा अहवाल ८ दिवसात शासनाकडे सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी यांनी छत्रपती संभाजी नगर विभागातील शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत.

हिंगोलीचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी यासंदर्भात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या तक्रारीनुसार, सेनगाव येथील ही शाळा केवळ कागदोपत्री सुरू दाखवण्यात आली होती. प्रत्यक्षात या ठिकाणी कोणतीही शाळा भरत नाही. या तक्रारीची दखल घेत प्रधान सचिवांनी चौकशीचे आदेश दिले होते.

चौकशीत धक्कादायक वास्तव समोर आले. शिक्षण विभागाने केलेल्या चौकशीत अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. शाळा बेपत्ता असल्याचे चौकशीदरम्यान विद्यानिकेतन प्राथमिक शाळा सेनगाव येथे कुठेही सुरू नसल्याचे आढळले.

यू-डायस' प्रणालीवर शाळेचे जिओ-टॅगिंग चुकीच्या पद्धतीने दर्शवण्यात आले होते. (Vidya Shakti Education Institute) ऑनलाईन प्रणालीवर विद्यार्थ्यांची संख्या प्रत्यक्षापेक्षा वेगळी आणि फुगवून सांगण्यात आली होती. शाळा अस्तित्वात नसतानाही शासनाकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटून सरकारचे मोठे आर्थिक नुकसान करण्यात आले आहे. विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा संचलित विद्या निकेतन प्राथमिक शाळेची मान्यता रद्द करावी. सदर शाळेची 'यू-डायस' नोंदणी (क्र. २७१६०२००११०) तातडीने रद्द करण्याबाबत तसेच या फसवणुकीत सहभागी असलेल्या संस्थाचालक आणि दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत. 

शासनाचे जे आर्थिक नुकसान झाले आहे, ती रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यात यावी अशी मागणी आ.तान्हाजी मुटकुळे यांनी पत्राव्दारे केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून ८ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे कक्ष अधिकारी प्रमोद कदम यांनी ६ मार्च २०२६ रोजी निर्गमित केलेल्या पत्रानुसार विभागीय शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर यांना आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात बोगस शाळा चालवून अनुदान लाटणार्‍या संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहेत.

Related to this topic: