Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > आपले शहर > विदर्भ > वर्धा

विधान परिषद निवडणुकीचा बिगुल; वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीत राजकीय हालचालींना वेग

महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर होताच वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागले आहे.


विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीत राजकीय हालचालींना वेग

Vidhan Parishad Election |

वर्धा (Vidhan Parishad Election) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर होताच वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा करताच संबंधित भागात आचारसंहिता लागू झाली असून इच्छुक उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

या मतदारसंघातून महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपालिका तसेच जिल्हा परिषदेमधील निवडून आलेले सदस्य मतदान करतात. आवश्यक मतदारांचा ८५ टक्के कोटा पूर्ण झाल्यानंतरच निवडणूक आयोगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २५ मे रोजी अधिसूचना जारी होणार असून १ जून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख राहणार आहे. १८ जून रोजी मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

या मतदारसंघाचा राजकीय इतिहासही महत्त्वाचा मानला जातो. सुरुवातीला वर्धा मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्याचाही समावेश होता. १९८२ ते १९८८ या काळात माजी आमदार जगन्नाथराव डांगे यांनी प्रतिनिधित्व केले. त्यानंतर १९८८ ते १९९४ दरम्यान वसंतराव वानखेडे सदस्य होते. १९९४ ते २००० आणि पुन्हा २००० ते २००६ या सलग दोन कार्यकाळात रामदास तडस यांनी प्रतिनिधित्व करत विक्रम नोंदविला. त्यानंतर जयुद्दीन झवेरी, नितेश भांगडिया आणि शेवटी रामदास आंबटकर यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

दरम्यान, नगरपरिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित राहिल्याने स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर पडली होती. आता निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

काँग्रेसकडून शिवानी वडेट्टीवार यांचे नाव चर्चेत असून खासदार धानोरकर गटाकडून वरोऱ्याचे माजी नगराध्यक्ष एहतेश्याम अली यांच्या नावासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपकडूनही नागपूरच्या एका उद्योजकाचे नाव चर्चेत आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक लागली की नगरपरिषद, नगरपालिका आणि जिल्हा परिषद सदस्यांना विशेष महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडून सदस्यांच्या भेटीगाठी आणि संपर्क मोहिमांना वेग आला आहे.

Related to this topic: