Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

भाजपा डॉ. प्रज्ञा सातव

डॉ. प्रज्ञाताई सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्याने हिंगोलीत भाजपाचा जल्लोष

BJP Dr. Pragya Satav: हिंगोलीत भाजपाने विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी डॉ. प्रज्ञाताई सातव यांची उमेदवारी जाहीर केली. यावेळी शहरात मोठ्या उत्साहात स्वागत आणि जल्लोष करण्यात आला.


डॉ प्रज्ञाताई सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्याने हिंगोलीत भाजपाचा जल्लोष 

BJP Dr. Pragya Satav |

हिंगोली (BJP Dr. Pragya Satav) : भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी डॉ. प्रज्ञाताई सातव यांची उमेदवारी जाहीर केली असून, या निर्णयाचे हिंगोली जिल्ह्यात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. उमेदवारीची घोषणा होताच भाजपाच्या वतीने शहराच्या गांधी चौकात कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष केला. १२ मे रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने डॉ. प्रज्ञाताई सातव (BJP Dr. Pragya Satav) यांना संधी देण्यात आली आहे. हिंगोलीत भाजपा पदधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आतिशबाजी करत मिठाई वाटून आनंद साजरा केला. यावेळी भारतीय जनता पक्षाचा विजय असो जय श्रीराम अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

यावेळी जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे, माजी जि.प उपाध्यक्ष मिलींद यंबल,युवामोर्चा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे, युवा नेते शशिकांत वडकुते जिल्हा सरचिटणिस उमेश नागरे,जिल्हा प्रवक्ता विलास गोरे,यांच्यासह नगरसेवक जितसिंग शाहु,कैलाश शहाणे,उमेश गुठ्ठे, बाबा घुगे,सदाशिव सुर्यतळ,श्रिरंग राठोड,संजय ढोके, शहराध्यक्ष रजनीश पुरोहीत, कार्याध्यक्ष पवन उपाध्ये,संजय खंडलेवाल,कैलाश श्रिनाथ,रितेश शहाणे,नितीन राठौर,बाळासाहेब नाईक,चांदु लांडगे,गुड्डु देवकते,अशिष शर्मा उपस्थित होते.

डॉ. सातव (BJP Dr. Pragya Satav) यांनी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवत ही उमेदवारी दिली आहे. यावेळी बोलताना भाजप नेत्यांनी सांगितले की, डॉ. प्रज्ञाताई सातव यांच्या उमेदवारीमुळे हिंगोली जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळेल आणि आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगर पंचायत निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद जिल्ह्यात वाढेल. या जल्लोशाला भाजपचे जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related to this topic: