Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

अकोला काँग्रेस नगरसेवक आकाश कवडे यांच्या कारची तोडफोड; परिसरात खळबळ

शहरात काँग्रेसच्या एका नगरसेवकाच्या वाहनाची तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे.


अकोला काँग्रेस नगरसेवक आकाश कवडे यांच्या कारची तोडफोड परिसरात खळबळ

Vehicle Damage |

अकोला (Vehicle Damage) : शहरात काँग्रेसच्या एका नगरसेवकाच्या वाहनाची तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे. काही अज्ञात व्यक्तींनी कारच्या मागील काचा फोडून नुकसान केल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक आकाश कवडे यांच्या वाहनाबाबत घडली आहे. आकाश कवडे हे काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक, युवक काँग्रेस प्रदेशचे उपाध्यक्ष आणि अकोल्याचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.

डाबकी रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत आकाश कवडे यांचे वास्तव्य असून, ही घटना घडली त्यावेळी ते घरीच उपस्थित होते. दरम्यान, या तोडफोडीमागील संशयितांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. या प्रकरणाची नोंद पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

घरासमोर उभी असलेली कार अज्ञातांकडून नुकसान करण्यात आल्याची माहिती मिळताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेनंतर संबंधित आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

Related to this topic: