Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ

अवकाळी पावसाचा तडाखा; नेर तालुक्यातील सिंदखेड येथे मेंढपाळ कुटुंबाचे २५ हजारांचे नुकसान

नेर तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने पुन्हा एकदा नागरिकांचे मोठे नुकसान केले.


अवकाळी पावसाचा तडाखा नेर तालुक्यातील सिंदखेड येथे मेंढपाळ कुटुंबाचे २५ हजारांचे नुकसान

Unseasonal Rain Damage |

नेर (Unseasonal Rain Damage) : नेर तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने पुन्हा एकदा नागरिकांचे मोठे नुकसान केले असून शिंदखेड येथील एका गरीब मेंढपाळ कुटुंबावर नैसर्गिक आपत्तीचे संकट कोसळले आहे. गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे वैभव शिंदे यांच्या घरावरील टिन पत्रे उडून गेली तर घराची भिंतही कोसळली. या घटनेत अंदाजे २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

वैभव शिंदे हे शिंदखेड येथील रहिवासी असून ते मेंढपाळ व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आधीच आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना अवकाळी पावसामुळे त्यांच्या कुटुंबासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. घराचे मोठे नुकसान झाल्याने कुटुंब उघड्यावर येण्याची वेळ आली असून नागरिकांनीही प्रशासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान, शिंदखेड येथील सामाजिक कार्यकर्ते मिलन राठोड यांनी प्रशासनाकडे पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. “गरीब मेंढपाळ कुटुंबाचे मोठे नुकसान झाले असून शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा,” असे त्यांनी सांगितले.

तसेच प्रशासनाने तत्काळ सर्वेक्षण करून मदत जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related to this topic: