Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली कृषी विभाग

कृषी विभागाच्या कामगिरीबद्दल जिल्हा सीड्स पेस्टिसाइड अँड फर्टीलायझर डीलर्स असोसिएशन तर्फे सत्कार

Hingoli Agriculture Department: हिंगोली जिल्ह्यातील कृषी विभागाने कृषकांना विनापरवानगी नाहीत जिप्सम खत विक्री करणाऱ्या दलालांवर कारवाई केली.


कृषी विभागाच्या कामगिरीबद्दल जिल्हा सीड्स पेस्टिसाइड अँड फर्टीलायझर डीलर्स असोसिएशन तर्फे सत्कार

Hingoli Agriculture Department |

 

कळमनुरी तालुक्यातील मसोड येथे विनापरवाना जिप्सम खता बाबत केली होती कारवाई

हिंगोली (Hingoli Agriculture Department) : कळमनुरी तालुक्यातील मसोड येथे कृषी विभागाने केलेल्या कारवाईबाबत  हिंगोली जिल्हा सीड्स पेस्टिसाइड अँड फर्टीलायझर डीलर्स असोसिएशन हिंगोली च्या वतीने कृषी विभागाचे अभिनंदन करण्यात आले.

१६ मे  रोजी कृषी विभागामार्फत कळमनुरी तालुक्यातील मासोड  येथे अनाधिकृत व निष्कृष्ट दर्जाचे जिप्सम खत शेतकर्‍यांना विनापरवानगी थेट गावात अनधिकृतितरित्या विक्री होत असताना केलेल्या धडक कार्यवाही केली ही बाब कौतुकास्पद आहे. भविष्यात यापुढेही आपल्या विभागामार्फत अशा अनधिकृत कृषी निविष्ठा विकणार्‍या लोकांवर कार्यवाही होत राहील असा आम्हाला ठाम विश्वास असल्याचे संघटनेच्या वतीने नमूद केले आहे.दरम्यान  या कारवाई बाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, जिल्हा कृषी अधिकारी अतुल वायसे, जिल्हा गुण नियंत्रक लक्ष्मण काळे, तालुका कृषी अधिकारी पंकज राठोड, मनोहर, तालुका कृषी अधिकारी वाळके, जाधव यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष आनंद निलावार , सचिव ज्ञानेश्वर वानखेडे,  कोषाध्यक्ष पवन पातुरकर, उपाध्यक्ष राहुल झांजरी, सहसचिव संतोष आखरे, तसेच गणेश मुटकुळे, संतोष आखरे, रितेश अग्रवाल इत्यादी कृषी केंद्र चालक उपस्थित होते.

Related to this topic: