Breaking News
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का
  • हनुमान जयंतीच्या शोभायात्रेत बेपत्ता झालेल्या बालकाचा संशयास्पद मृत्यू
  • लग्नसोहळ्यात थरार! पुतण्याच्या हल्ल्यात काका-चुलत भावाचा खून
  • इराणची विनाशकारी योजना; गूगल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉनची कार्यालये उडवण्याची धमकी
  • IAS तुकाराम मुंढे यांची 21 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल '24 वेळा' बदली
  • नासाची आर्टेमिस-2 मोहीम; 54 वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्र मोहिमेकडे
  • 'कूपर कॉनोली' ठरला पंजाब किंग्सच्या विजयाचा हिरो

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

उदगिर धरणे आंदोलन

उदगीर जिल्हा निर्मितीसाठी उदगिरात धरणे आंदोलन

Udgir Dharne Andolan: उदगीरमध्ये स्वतंत्र जिल्ह्याच्या मागणीसाठी आंदोलन चालू असून, उपजिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. नागरिकांनी तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात सहभाग दर्शविला.


उदगीर जिल्हा निर्मितीसाठी उदगिरात धरणे आंदोलन

Udgir Dharne Andolan |

उपजिल्हाधिकार्‍यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

उदगीर (Udgir Dharne Andolan) : उदगीर जिल्हा झाला निर्मितीसाठी उदगीरकर आक्रमक झाले असून जिल्हा निर्मितीसाठी उदगीरकरांनी दि.६ एप्रिल रोजी सकाळी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत उपजिल्हाधिकारी  सुशांत शिंदे यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, उदगीर शहर व परिसरातील विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी राज्य शासनाकडे स्वतंत्र उदगीर जिल्हा निर्माण करण्याची मागणी केली असून ही मागणी जोर धरत आहे. यासाठी आता  आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा देण्यात आला आहे.  

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, ऐतिहासिक वारसा लाभलेले उदगीर हे शहर भौगोलिकदृष्ट्या तीन राज्यांच्या सीमेवर वसलेले असूनही दळणवळणाच्या दृष्टीने काहीसे मागासलेले आहे. असे असतानाही शहराने आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. सध्या (Udgir Dharne Andolan) उदगीर, देवणी, जळकोट, अहमदपूर या तालुक्यांना प्रशासकीय कामांसाठी लातूर येथे जावे लागते. हे अंतर साधारण 65 ते 85 किलोमीटर असल्याने नागरिकांना प्रवास, वेळ आणि आर्थिक खर्चाचा मोठा त्रास सहन करावा लागतो.

यामुळे स्वतंत्र जिल्ह्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे. (Udgir Dharne Andolan) निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, मराठवाडा महसूल विभागाचा समतोल विकास साधण्यासाठी लातूर जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र उदगीर जिल्हा निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यालये आणि इमारती उदगीर येथे तातडीने स्थापन कराव्यात, तसेच मनुष्यबळाची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असून शासनाच्या अनास्थेमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळेच आता आंदोलनाची भूमिका घेतली असून, सोमवार, दि. 6 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर साखळी उपोषण, आमरण उपोषण यांसारख्या संवैधानिक मार्गांचा अवलंब करण्याचा इशारा  उदगीरकरांनी यावेळी दिला.

या (Udgir Dharne Andolan) निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील तसेच माजी मंत्री व आमदार संजय बनसोडे यांनाही देण्यात आल्या आहेत. उदगीर जिल्हा निर्मितीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, शासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भविष्यात उदगीर जिल्हा निर्मितीसाठी उदगीरकर तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे दिसून आले. आगामी काळात तीव्र लढा उभारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर उदगीरकरांचा या धरणे आंदोलनात सहभाग दिसून आला.

Related to this topic: