Breaking News
  • तामिळनाडूमध्ये एआयएडीएमके भाजपला सोडणार ?
  • धक्कादायक खुलासा! मुंबईतील कुटुंब मृत्यू प्रकरणात ‘झिंक फॉस्फाइड’ विषाचे धागेदोरे सापडले
  • दहावी निकाल जाहीर; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के; मुलींची पुन्हा आघाडी
  • TCS ‘धर्मांतर’ प्रकरणात मोठी घडामोड; नारेगावातून निदा खान अटकेत
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात

होम > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर

भरधाव टिप्परने युवकाला उडवले; नांद्रा परिसरात संताप

: वरोरा तालुक्यातील चरूर पाटी गावादरम्यान एक भीषण अपघात घडून एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.


भरधाव टिप्परने युवकाला उडवले नांद्रा परिसरात संताप

Tippar Accident |

वरोरा (Tippar Accident) : वरोरा तालुक्यातील चरूर पाटी गावादरम्यान एक भीषण अपघात घडून एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रोड बांधकामाच्या कामावरून परतत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने युवकाला धडक दिली.

मृतकाचे नाव सुनील कुमरे (वय ३०) असून तो नांद्रा येथील रहिवासी आहे. दहिवल नाला ते वनोजा बायपास रोडचे काम सुरू असताना संबंधित टिप्पर हा कामावरचाच असल्याचे सांगितले जात आहे. तसेच हा टिप्पर गिरनारी कन्स्ट्रक्शन कंपनीचा असल्याची माहिती समोर येत आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या मते, टिप्पर भरधाव वेगात होता आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. धडक इतकी भीषण होती की, सुनील कुमरे यांचा जागीच मृत्यू झाला.

या मार्गावर यापूर्वीही अनेक अपघात घडले असून, रस्त्याची अत्यंत खराब अवस्था आणि मोठमोठी भगदाडे यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. स्थानिकांनी सांगितले की, मागील एका वर्षात हा जवळपास चौथा बळी आहे. मात्र, वेकोली प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.

या घटनेनंतर नांद्रा व परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

स्थानिकांची मागणी:

  • रस्त्यावरील भगदाडे तात्काळ बुजवावीत
  • भरधाव धावणाऱ्या टिप्पर व ट्रकवर नियंत्रण ठेवावे
  • संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करावी
  • मृतकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी

नागरिकांनी इशारा दिला आहे की, जर तात्काळ उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.

या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, संबंधित टिप्पर चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Related to this topic: