Breaking News
  • 'जगाच्या नकाशावर राहायचं की इतिहासजमा व्हायचं?'; पाकिस्तानला लष्करप्रमुखांचा थेट इशारा
  • यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली
  • अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त
  • बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला
  • दिवे घाटात दहशत पसरवणाऱ्या बुलेट राजांचा माज पोलिसांनी मोडला!
  • शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
  • CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी
  • रत्नागिरी- जिल्ह्यात CNG GAS चा मोठ्या प्रमाणात तुटवडा
  • मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार;प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

तेली समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

साई मंगल मॅरेज ब्युरोच्या वतीने जगनाडे चौक परिसरातील सती अनुसया मंगल कार्यालयात आज 12 एप्रिल रोजी तेली समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.


तेली समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद 

Teli Community |

'लाइफ पार्टनर’ पुस्तकाचे प्रकाशन; शेकडो युवक-युवतींचा सहभाग

नागपूर (Teli Community) : साई मंगल मॅरेज ब्युरोच्या वतीने जगनाडे चौक परिसरातील सती अनुसया मंगल कार्यालयात आज 12 एप्रिल रोजी तेली समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास समाजातील युवक-युवती व त्यांच्या पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जवाहर विद्यार्थी गृहाचे माजी मुख्य कार्यवाह  शंकरराव भुते होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर तथा जवाहर विद्यार्थी गृहाचे  अध्यक्ष शेखर सावरबांधे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी समाजातील विवाह जुळवणी प्रक्रियेला गती देण्यासाठी अशा मेळाव्यांचे महत्त्व अधोरेखित केले. युवक-युवतींनी योग्य निर्णय घेऊन उज्ज्वल भविष्य घडवावे, असे मार्गदर्शनही त्यांनी केले. मेळाव्यात तेली समाजातील शेकडो युवक-युवतींनी आपला परिचय करून दिला. यावेळी निशुल्क सर्वाधिक विवाह जुळवल्याबद्दल पुंडलिकराव रेवतकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मेळाव्यात ‘लाइफ पार्टनर’ या पुस्तकाचे देखील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन कृष्णा घुगुसकर व अनिल साखरकर यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी केशवानंद सुरकार, ऍड. मोहन देवतळे, तनुजा घुगुसकर, दीप्ती लांजेवार आदींनी अथक परिश्रम घेतले.

Related to this topic: