Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

पातूर सुधाकर कराळे

पातूर येथे होमगार्ड तालुका प्रभारी समादेशकपदी सुधाकर कराळे यांची नियुक्ती

Patur Sudhakar Karale: पातूर येथे होमगार्ड तालुका प्रभारी समादेशकपदी सुधाकर कराळे यांची नियुक्ती झाली. यामुळे पातूर पथकात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.


पातूर येथे होमगार्ड तालुका प्रभारी समादेशकपदी सुधाकर कराळे यांची नियुक्ती

Patur Sudhakar Karale |

पातुर तालुका पथकाची धुरा सुधाकर कराळे यांच्या खांद्यावर

पातूर (Patur Sudhakar Karale) : पातूर येथील होमगार्ड पथकात गेल्या एक वर्षापासून प्रभारी समादेशक संतोष ढबारे (बाळापूर) यांच्या कडे अतिरिक्त च्यार्ज सोपविण्यात आला होता. त्यामुळे पातूर येथील होमगार्डना कार्यालयीन कामकाजासाठी बाळापूर येथे वारंवार जावे लागत असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.ही बाब जिल्हा होमगार्ड समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ दखल घेतली. जिल्हा समादेशक चंद्रकांत रेड्डी त्यांच्या आदेशानुसार तसेच प्रशासिक अधिकारी अशोक आसोलकर,लिपिक प्रमुख शिवाजी आघाव, कार्यालयीन लिपिक अभिषेक देशमुख,प्रशिक्षण अधिकारी सुनील पोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २५ मार्च रोजी पातूर पथकातील होमगार्ड सुधाकर विश्वनाथ कराळे (Patur Sudhakar Karale) यांच्याकडे पातुर तालुका प्रभारी समादेशक पदभार सोपविण्यात आला.

सुधाकर कराळे (Patur Sudhakar Karale) यांच्या नियुक्तीमुळे पातूर पथकात समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.दि.५ एप्रिल रोजी साप्ताहिक कवायतीदरम्यान उपस्थित होमगार्डच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी तालुका प्रभारी समादेशक संगीता इंगळे यांनीही त्यांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी उपस्थित होमगार्डच्या चेहऱ्यावर समाधान आणि उत्साह दिसून येत होता.सुधाकर कराळे यांच्या नियुक्तीमुळे पातूर पथकात खेळीमेळीचे व सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

Related to this topic: