Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

नीट परीक्षा घोटाळ्याविरोधात नांदेडमध्ये एसएफआयचे तीव्र आंदोलन

स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.


नीट परीक्षा घोटाळ्याविरोधात नांदेडमध्ये एसएफआयचे तीव्र आंदोलन

Student Protest India |

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी

​नांदेड (Student Protest India) : नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी, निकालातील सावळागोंधळ आणि शिक्षण क्षेत्रातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात आज स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी केंद्र सरकार आणि शिक्षण माफियांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. आंदोलनानंतर एसएफआयच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

​या निवेदनात एसएफआयने आरोप केला आहे की, राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) नीट परीक्षेच्या गोपनीयतेचा पुरता खेळ खंडोबा केला असून वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे सामान्य कुटुंबातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची केंद्र सरकारने क्रूर थट्टा केली आहे. हा केवळ एक घोटाळा नसून प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या कष्टाची दिवसाढवळ्या झालेली लूट आहे. या पार्श्वभूमीवर, देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या या गंभीर घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मुख्य मागणी संघटनेने केली आहे.

​तसेच या संपूर्ण घोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, पेपरफुटीच्या मुख्य सूत्रधारांना कठोर कायद्यांतर्गत जन्मठेपेची शिक्षा व्हावी आणि ज्या परीक्षा केंद्रांवरून हे गैरप्रकार झाले आहेत त्यांची मान्यता त्वरित रद्द करण्यात यावी, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. जोपर्यंत परीक्षा प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता येत नाही तोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई सुरूच राहावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.

​शिक्षण संस्थांच्या व्यापारीकरणामुळे आणि केंद्र व राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळे आज तरुण विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नैराश्य पसरले असून लाखो तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन आमच्या मागण्या तात्काळ केंद्र सरकारकडे पोहोचवाव्यात, अशी विनंती एसएफआयने केली आहे. या आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी आणि एसएफआय चे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related to this topic: