आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि पक्ष संघटनेच्या मजबुतीसाठी शिवसेना मराठवाडा तथा हिंगोली लोकसभा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहरात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
हिंगोली (Shiv Sena Meeting) : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि पक्ष संघटनेच्या मजबुतीसाठी शिवसेना मराठवाडा तथा हिंगोली लोकसभा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहरात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीला जिल्ह्यातील शिवसेनेचे दिग्गज नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेत्यांची मांदियाळी या बैठकीला शिवसेनेचे प्रमुख नेते आमदार संतोष बांगर, माजी आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा, माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या नेत्यांनी जिल्ह्यातील सद्य राजकीय स्थिती आणि विकासकामांबाबत आपले विचार मांडले. महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींनीही आपला सहभाग नोंदवला. यामध्ये हिंगोली नगर परिषद शिवसेना गटनेते श्रीराम बांगर, उपनगराध्यक्ष माबुद बागवान, कळमनुरीचे नगराध्यक्ष आर. आर. पाटील, राजू चापके, युवा जिल्हा प्रमुख राम कदम, सह संपर्कप्रमुख राजेंद्र शिखरे, माजी शिक्षण सभापती संजय भैय्या देशमुख, धनु पाटील, नगरसेवक गणेश बांगर, कपिल खंदारे शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई देवकते, शिवसेना शहर प्रमुख अशोक नाईक, शिवसेनेचे सेनगाव तालुकाप्रमुख अमोल पाटील, नगरसेवक कपिल खंडेलवाल, विशाल गोटरे नितीन बांगर, माजी नगरसेवक संदीप मुदिराज, राहुल बांगर, अक्षय लव्हाळे, हकीम बागवान यांच्यासह हिंगोली जिल्ह्यातील अनेक नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
संघटनेवर भर संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत शिवसेनेचे विचार आणि शासकीय योजना पोहोचवणे आवश्यक आहे. प्रभागनिहाय आणि गाव पातळीवर पक्ष संघटना अधिक सक्रिय करण्यासाठी त्यांनी विविध सूचना दिल्या. आगामी काळात शिवसैनिकांनी एकजुटीने काम करून जिल्ह्याचा विकास आणि पक्षाची ताकद वाढवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. या बैठकीमुळे हिंगोली जिल्ह्यातील शिवसैनिकां मध्ये नवा उत्साह संचारला असून, आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.