Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

जिल्हा बँक विमा

जिल्हा बँकेत पगार होणाऱ्या शिक्षकाच्या वारसास मिळाले 45 लाखाचे विमा कवच

District Bank Insurance: अकोला-वाशिम जिल्हा बँकेतील शिक्षक विलास सोमटकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला 45 लाख रुपयांचा विमा कवच प्रदान करण्यात आला.


जिल्हा बँकेत पगार होणाऱ्या शिक्षकाच्या वारसास मिळाले 45 लाखाचे विमा कवच

District Bank Insurance |

आमदार अमित झनक यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण

रिसोड (District Bank Insurance) : अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पगार होणाऱ्या कर्मचाऱ्या करीता बँकेच्या संचालक मंडळाकडुन पगारदार अपघात विमा पॉलिसी लागु केली आहे.या विमा पाॅलिसीचा लाभ मृतक विलास निवृत्ती सोमटकर यांच्या कुटुंबातील सदस्यांना नुकताच मिळाला आहे.

बँक (District Bank Insurance) स्वखर्चाने अपघात विमा पॉलिसीचा प्रीमियम भरते. मांगुळ झनक शाखेचे पगार कर्मचारी तथा  शिवाजी विद्यालय गोभनी चे शिक्षक कै. विलास निवृत्ती सोमटकर यांचा अपघाती मृत्यू झाला.सदरची माहिती ही मांगुळ झनक चे शाखाधिकारी  एस.व्ही.नागरे यांना मिळाल्यानंतर सर्व कागदपत्रे मुख्य कचेरीचे हिशेब व बँकिंग विभागाचे प्रफुल पाटील यांच्या कडे विमा क्लेम पुढील कार्यवाही करीता पाठविण्यात आले. बँकेकडुन कागद पत्राची पुर्तता झाल्यानंतर त्यांना वैयक्तिक अपघात विमा रु.30 लाख व ओ.डी अपघात विमा रक्कम रुपये 15 लाख असे एकूण रुपये 45 लाख विमा क्लेम मंजुर करण्यात आला.

अपघात विम्याची रक्कम मृतक शिक्षक कै.विलास निवृती सोमतकर यांच्या पत्नी श्रीमती कल्पना विलास सोमटकर यांना बँकेचे  माजी अध्यक्ष डॉ.संतोषकुमार कोरपे,बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा.डॉ.जयराज संतोषकुमार कोरपे,नवनिर्वाचित उपाध्यक्ष मा. रामेश्वर सुभाषराव ठाकरे  यांच्या मार्गदर्शनात बँकेचे माजी संचालक तथा विद्यमान आमदार मा. अमित झनक व नवनिर्वाचित संचालक मा. डॉ धिरज देशमुख व (District Bank Insurance) बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.अनंत वैद्य यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.सदर कार्यक्रमाला शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी,मुख्याध्यापक गावंडे तालुकाप्रमुख सुभाष तलवारे,मार्केटिंग अधिकारी ग्रेड 1  पी.एन.जाधव,पा.शाखाधिकारी  आर.टी.मस्करे.एस पी कोकाटे,सर्व निरीक्षक,डी.ए.मुंढे कार्यालयीन सचिव देखरेख संघ, बी. एन. मोरे व सर्व सचिव तथा रिसोड तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटीचे प्रतिनिधी,बँकेच्या रिसोड मुख्य शाखेसह मांगुळ झनक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.

अकोला-वाशिम जिल्हा बँकेत (District Bank Insurance) पगारदार होणाऱ्या कर्मचाऱ्या करीता सुरू करण्यात आलेल्या अपघात विम्याचा आत्ता पर्यंत 27 पगारदार कर्मचाऱ्यांच्या वारसदारास लाभ मिळाला आहे. पगारदार शिक्षकांच्या वारसदारा कडुन बँकेचे  आभार व्यक्त केले.

आ. अमित झनक
खरीप हंगामातील पिक कर्जाचे  वाटप हा 10% ने वाढीव वाटप करण्यासाठी प्रयत्न करणार आसुन,पगारदार कर्मचा-यांनी आपल्या हक्काच्या मागण्या साठी शासणा विरोधात आंदोलन केल्यास,शासणाच्या आदेशानुसार बॅकेकडुन त्यांचे खाते आंदोलना दरम्यान होल्ड करण्यात येते.यामुळे पगारदार कर्मचा-यांना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागते.हा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. अमित झनक यांनी सांगितले.

Related to this topic: