Shetkari Sangharsh Nyaya Yatra: महाराष्ट्रात काँग्रेसचे आयोजन केलेल्या 'शेतकरी संघर्ष न्याय यात्रा'मध्ये हजारो कार्यकर्ते व शेतकरी सहभागी होणार. यात्रेचा उद्देश शेतकरी प्रश्नांना वाचा फोडणे आहे.
जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते धाराशिवकडे कूच करणार: साळुंके
लातूर (Shetkari Sangharsh Nyaya Yatra) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित "शेतकरी संघर्ष न्याय यात्रा" सोमवारी (दि. ३० मार्च २०२६) आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेमध्ये लातूर जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाने या संघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. या (Shetkari Sangharsh Nyaya Yatra) यात्रेचा प्रारंभ सोमवार, दि. ३० मार्च रोजी सकाळी ८ वाजता सोलापूर-तुळजापूर हायवेवरील सुरतगाव (जि. धाराशिव) येथून होणार आहे. दिवसभर चालणाऱ्या या यात्रेचा समारोप त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता तुळजापूर येथे होईल.
या (Shetkari Sangharsh Nyaya Yatra) यात्रेच्या नियोजनासाठी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री आ. अमित विलासरावजी देशमुख, खा.डॉ. शिवाजी काळगे व प्रदेश प्रवक्ते तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासरावजी देशमुख यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष अभय साळुंके व शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी लातूर जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्षांना (ग्रामीण व शहर) आपापल्या भागातून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना सोबत घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रांताध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा मराठवाड्याच्या अस्मितेचा आणि शेतकरी एकजुटीचा हुंकार ठरणार आहे.
या (Shetkari Sangharsh Nyaya Yatra) यात्रेमध्ये जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत यांचे नगरसेवक, विविध सेलचे अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात काँग्रेस रस्त्यावर
लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून, या यात्रेसाठी लातूर शहर, लातूर ग्रामीण, अहमदपूर, औसा, निलंगा, उदगीर, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट आणि शिरूर अनंतपाळ या सर्व तालुक्यातून कार्यकर्ते मोठ्या उत्साहात धाराशिवकडे रवाना होणार आहेत. "शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला असून, लातूर जिल्हा या आंदोलनात अग्रभागी असेल," असा विश्वास अभय साळुंके यांनी व्यक्त केला आहे.