Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

आ. सतीश चव्हाण उद्या सेनगावात; शिक्षक संघाचा भव्य सत्कार सोहळा

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण हे उद्या (दि. 26 एप्रिल) सेनगाव येथे येत असून अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यास ते प्रमुख उपस्थित राहणार आहेत.


आ सतीश चव्हाण उद्या सेनगावात शिक्षक संघाचा भव्य सत्कार सोहळा

Senangaon Event |

सेनगाव (Senangaon Event) : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण हे उद्या (दि. 26 एप्रिल) सेनगाव येथे येत असून अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यास ते प्रमुख उपस्थित राहणार आहेत. सकाळी 9.30 वाजता हॉटेल सुरुची येथे हा कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती संघाचे जिल्हाध्यक्ष व्ही. डी. देशमुख यांनी दिली.

या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अनिल पतंगे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच एमपीएससीच्या माध्यमातून उपशिक्षणाधिकारी पदावर निवड झालेले शिवलिंग साखरकर यांचाही गौरव करण्यात येणार आहे. यासोबतच तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक अशोकराव कावरखे, नामदेवराव तांबिले, संभाजी बोरकर, बी. जी. धाबे, अशोक शिरामे, डी. टी. कावरखे, विश्वंभर गुठ्ठे, आनंदा काळे आणि प्रल्हाद मस्के यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी पंचायत समिती सभापती आप्पासाहेब देशमुख, माजी उपसभापती रवींद्र गडदे, नगराध्यक्ष वैभव देशमुख, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष देवकर, माजी नगराध्यक्ष कैलासराव देशमुख, राजकुमार देशमुख, संदीप बहिरे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

यावेळी आमदार सतीश चव्हाण हे तालुक्यातील शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, नोकरदार व पदवीधर मतदारांशी संवाद साधणार असून विविध शैक्षणिक व सामाजिक विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे सुशिक्षित व सजग नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष व्ही. डी. देशमुख, तालुकाध्यक्ष मधुकर गडदे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने सेनगाव येथे शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर एकत्र येणार असल्याने या सोहळ्याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: