Breaking News
  • 'जगाच्या नकाशावर राहायचं की इतिहासजमा व्हायचं?'; पाकिस्तानला लष्करप्रमुखांचा थेट इशारा
  • यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली
  • अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त
  • बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला
  • दिवे घाटात दहशत पसरवणाऱ्या बुलेट राजांचा माज पोलिसांनी मोडला!
  • शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
  • CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी
  • रत्नागिरी- जिल्ह्यात CNG GAS चा मोठ्या प्रमाणात तुटवडा
  • मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार;प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

सनराइज् इंग्लिश स्कूलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले  जयंती उत्साहात साजरी


सनराइज् इंग्लिश स्कूलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले  जयंती उत्साहात साजरी

School Event |

रिसोड (School Event)  : आज सनराइज् इंग्लिश स्कूलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्राचार्या मा. सौ. रोजमेरी जोस मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर शाळेतील शिक्षक श्री. श्रीहरी पवार सर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याविषयी मार्गदर्शन केले तसेच आपल्या भाषणात सामाजिक असमानता व अज्ञान दुर करण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व विशद केले.

जयंती उत्सवानिमित्त शाळेमध्ये इ. दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर इलोक्युशन कॉम्पिटिशन घेण्यात आली. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी म.जोतिबा फुले विषयावर पॅरेग्राफ राइटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही स्पर्धांमध्ये संबंधित इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन भरभरून प्रतिसाद दिला. 

जयंती निमित्ताने इ. दहावीतील विद्यार्थिनींसाठी 'महात्मा ज्योतिबा फुले - वुमेन एज्युकेशन अँड वूमन एम्पॉवरमेंट' या विषयावरती विशेष सेशनचे आयोजन करण्यात आले होते. या सेशनमध्ये शाळेतील शिक्षिका सौ. शुभांगी मानमोठे यांनी स्त्री शिक्षण व सबलीकरणामध्ये महात्मा फुले यांचे योगदान तसेच स्त्रियांच्या आजच्या यशामागे ज्योतिबा फुले यांचा आयुष्यभराचा संघर्ष याबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिक्षण व सामाजिक सुधारणा यातील योगदानासाठी अभिमान व्यक्त केला.

Related to this topic: