Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

सहकारातून समृद्धीकडे वाटचाल

पतसंस्थांच्या कार्याचा गौरव करणारा भव्य सोहळा संभाजीनगरात संपन्न

Nanded Cooperative Council: नांदेड सहकार परिषद आणि सन्मान सोहळ्यात बहुराज्यीय संस्थांच्या कार्याचा गौरव करण्यात आला, ग्रामीण विकासात त्यांच्या योगदानाची पुनरावलोकन.


पतसंस्थांच्या कार्याचा गौरव करणारा भव्य सोहळा संभाजीनगरात संपन्न

Nanded Cooperative Council |

नांदेड (Nanded Cooperative Council ) : कष्टाने कमावलेल्या धनाची सुरक्षित गुंतवणूक ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील आर्थिक गरजा ओळखून बहुराज्यीय संस्थांनी उभारलेली विश्वासार्ह व्यवस्था आज समाजाच्या विकासाचा भक्कम आधार बनली आहे. याच बहुराज्यीय संस्थांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘सहकारातून समृद्धी’ या संकल्पनेवर आधारित सहकार परिषद आणि कॉफी टेबल बुक प्रकाशन सोहळा आज संभाजीनगर येथील हॉटेल ट्रीट इंपिरियल येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

या (Nanded Cooperative Council) सोहळ्यात नांदेड जिल्ह्यातील नामांकित श्रीवेद मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मारोतीराव कंठेवाड व कार्यकारी संचालिका सविता कंठेवाड यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अतुल सावे (इतर मागासवर्ग, बहुजन कल्याण तथा नाविन्यपूर्ण ऊर्जा मंत्री), डॉ. शांतीलाल सिंगी (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन), समृत जाधव (जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था) तसेच विवेक जुगादे (सदस्य, महाराष्ट्र राज्य सहकार धोरण उच्चस्तरीय समिती, महामंत्री, सहकार भारती, महाराष्ट्र प्रदेश) यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात ‘सकाळ’ समूहाचे मुख्य संपादक सम्राट फडणीस सर, मराठवाडा संपादक संतोष शालिग्राम सर, मराठवाडा युनिकचे प्रमुख संजय चिकटे सर तसेच दैनिक सकाळचे नांदेडचे उपसंपादक काकडे यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या परिषदेत बहुराज्यीय संस्थांच्या योगदानावर सखोल चर्चा झाली तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सहकार क्षेत्राची भूमिका अधोरेखित करण्यात आली.

या (Nanded Cooperative Council) सोहळ्यात नांदेड जिल्ह्यातील नामांकित श्रीवेद मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीचा विभागीय स्तरावर सन्मान करण्यात आला. हा सन्मान संस्थेच्या प्रेरणादायी प्रवासाची आणि समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची साक्ष देणारा ठरला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारोतीराव गणपतराव कंठेवाड, चेअरमन शंकरराव चांडोळकर, व्हाईस चेअरमन सुदाम पाटील तोडे व कार्यकारी संचालिका सविता मारोतीराव कंठेवाड यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून राज्यातील उत्कृष्ट बहुराज्यीय संस्थांचा प्रवास,नवउद्योजकांना आर्थिक बळ, ग्राहकांसाठी आकर्षक कर्ज योजना, वर्षाअखेरची संस्थेची आर्थिक स्थिती व त्यांची कामगिरी आणि सामाजिक बांधिलकी जोपासत शेतकर्‍यांसाठी बिबियाने वाटप, तसेच गोसेवा व समाजाला दिलेला आर्थिक आधार यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. या पुस्तकामुळे सहकार क्षेत्रातील सकारात्मक कामाची माहिती व्यापक स्तरावर पोहोचणार असून नव्या पिढीला प्रेरणा मिळणार आहे. एकूणच, सहकार परिषद आणि सन्मान सोहळा हा पतसंस्थांच्या कार्याचा गौरव करणारा तसेच ‘सहकारातून समृद्धी’ या संकल्पनेला बळ देणारा ठरला. ग्रामीण भागाच्या विकासात बहुराज्यीय संस्थांची भूमिका किती महत्त्वाची आहे, याची पुन्हा एकदा जाणीव या कार्यक्रमातून झाली.

Related to this topic: