Breaking News
  • वाढत्या पेट्रोल दरांचा परिणाम? पेट्रोल चोरीच्या घटनांत वाढ
  • पश्चिम नागपुरात वारंवारच्या लोडशेडिंगने विरोधात कॉंग्रेसकडून मुख्य विद्युत भवन कार्यालयात जोरदार आंदोलन
  • पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे महिलेचा धारधार शास्त्राने वार करून खून
  • इंदापूर तालुक्यातील प्रश्न पेटला, कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच
  • नंदुरबार बाजार पेठेत गवारची आवक वाढल्याने गवारचे दर अचानक घसरले
  • कल्याणच्या दुर्गाडी मंदिर प्रवेशबंदीच्या मुद्द्यावर कल्याणमध्ये राजकारण तापले
  • शिवसेनेचा पुणे महानगरपालिकेवर हल्लाबोल मोर्चा
  • नीट पेपरफुटी प्रकरण; पुण्यातील आणखी प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर?
  • नाणेघाटावर धुक्याची पांढरी चादर; इंद्रवज्र पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

होम > आपले शहर

बायगाव बु. येथे रात्री शेतातील २ घरांवर दरोडा

अंढेरा येथूनच जवळच असलेल्या बायगाव बु. येथे शेतातल दोन घरांवर दरोडा टाकून चोरट्यांनी ७ लाखांच्या दागिण्यांसह रोख रक्कम लंपास केली.


बायगाव बु येथे रात्री शेतातील २ घरांवर दरोडा

७ लाखावर दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

अंढेरा (Robbery Case) : येथूनच जवळच असलेल्या बायगाव बु. येथे शेतातल दोन घरांवर दरोडा टाकून चोरट्यांनी ७ लाखांच्या दागिण्यांसह रोख रक्कम लंपास केली. येथील सेवानिवृत्त ग्रामसेवक दत्तू विष्णू खरात व सेवानिवृत्त तलाठी यांचे कुटूंब गावा शेजारील गट नंबर २११ मध्ये वास्तव्य करतात.

एक आरोपी गच्चीवरुन उडी मारल्यामुळे जखमी झाला

१७ मार्चच्या रात्री १ वाजता खदान रोडवरील घराबाहेरील गव्हाजवळ शिवनारायण ताकतोडे हे झोपलेले असताना काळ्या रुमालने तोंड बांधलेले ४ चोरटे जवळ येवून 'तुझे घर उघड असे बोलून कानाला चाकू लावत घर उघडण्यास भाग पाडले. घरात भारत ताकतोडे यांची पत्नी, मुलगा, भावजय, पुतण्यावत्यांचे कुटुंबातील व्यक्तींना व सर्वांचे मोबाईल हिसकावले. आणि घरातील नगदी ३० हजार रूपये, गळ्यातील एकदानी, कुडके, टापसे, मोर्नी झुंबर, गहू पोत असे दागिने घेत त्या परिवाराला वेठीस धरत शेजारी झोपलेले सेवानिवृत्त ग्रामसेवक दत्तू खरात यांच्या बाजे जवळ जात त्यांना जागी करत चोरांनी 'तुझे घर उघड 'असे म्हणून धाक धाकवत घर उघडले असता झोपलेली पत्नी सुनंदा दत्तू खरात व मुलगी दक्ष प्रवीण जाधव, मुलगा जागा होत सर्व पैसे व दागिने द्या, असे सांगत चाकूचा धाक दाखवत घरातील सोनं, चांदी, कुडके गहू पोथ, एकदानी, मणी, मंगळसूत्र, डोरले असे दोन्ही घरातील संपूर्ण माल चोरी करत मोटार सायकल घेवून तिघे जण मुद्देमाल घेतपसार झाले. मात्र गच्चीवरील ध्यान ठेवणारा चोर उडी मारतांना जखमी झाला असता मोटारसायकल सह गावकऱ्यांच्या हाती लागला. काही वेळा नंतर त्या दरोडेखोरास पोलिसांच्या स्वाधीन केले.

गावाकऱ्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले

एका महिलेच्या प्रसंगाधवाने चक्क त्या महिलेने गावात फोन लावल्याने गावकरी धावत येत, त्यांना मदत केली अन् त्या दरोडा पडलेल्या घरातील लोकांनी सुटकेचा श्वास सोडला. पहिल्या घरातील कुटूंबास बाहेरून कडी लावत ओलीस ठेवले. गावकरी आल्याने दुसऱ्या घरात चोर असल्याचे सांगत. गावकरी धावले अन् चोरांचा प्लॅन बी फसला चोर हाती लागला व रात्रीपासून पोलीस यंत्रणा तपास करत असून उर्वरित आरोपीचा शोध घेत आहे. फिर्यादीवरून ४ चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

 

Related to this topic: