Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोलीच्या विकासाला गती: आ. तान्हाजीराव मुटकुळेंच्या पाठपुराव्याने 180 कोटींचा महामार्ग मंजूर, कोंडीतून सुटका होणार

हिंगोली शहरवासीयां साठी आज अत्यंत आनंदाची बातमी आली आहे.


हिंगोलीच्या विकासाला गती आ तान्हाजीराव मुटकुळेंच्या पाठपुराव्याने 180 कोटींचा महामार्ग मंजूर कोंडीतून सुटका होणार

Road Development |

हिंगोली (Road Development) : हिंगोली शहरवासीयां साठी आज अत्यंत आनंदाची बातमी आली आहे. शहरातील वर्षानुवर्षांची वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांच्या दिल्लीतील सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हिंगोलीसाठी 180.38 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी स्वतः समाज माध्यमावर याबतची घोषणा केली. महाराष्ट्रातील हिंगोली शहरांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 461 ब च्या 6.78 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे पक्के बाजूपट्टे म्हणजेच पेव्ह्ड शोल्डरसह चौपदरी रस्त्यामध्ये रूपांतर केले जाणार आहे. हिंगोली शहरात सध्या जाणवत असलेल्या प्रचंड वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अरुंद रस्ते, वाढती वाहनसंख्या आणि बाजारपेठेतील गर्दीमुळे नागरिकांना दररोज प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. शाळकरी मुले, रुग्णवाहिका आणि नोकरदार वर्गाला याचा सर्वाधिक फटका बसत होता.

या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ रस्त्याचे रुंदीकरण होणार नसून, शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या दोन मोठ्या कामांचा समावेश आहे. कयाधू नदीवर एका सुसज्ज मोठ्या पुलाचे बांधकाम केले जाणार आहे. त्याचबरोबर शहराच्या मध्यभागी असलेल्या रेल्वे फाटकामुळे होणारी वाहतूक कोंडी कायमची संपवण्यासाठी एका रेल्वे उड्डाणपुलाचे म्हणजेच आरओबीचे बांधकामही या निधीतून होणार आहे. या दोन्ही पुलांमुळे शहरातील वाहतूक पूर्णपणे सुरळीत होईल आणि नागरिकांच्या वेळेची व इंधनाची मोठी बचत होईल.

याबाबत बोलताना आमदार तान्हाजीराव मुटकुळे म्हणाले की, "हिंगोलीच्या विकासाचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रगतीचा महामार्ग आणि गतीशक्ती या योजनेंतर्गत हिंगोलीला हा निधी मिळाला याचा आनंद आहे. मंत्री नितीन गडकरी यांनी हिंगोलीकरांच्या मागणीला तातडीने प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या चौपदरी रस्त्यामुळे फक्त शहरातीलच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याच्या व्यापार आणि दळणवळणाला नवी चालना मिळेल." 

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हिंगोली शहराचे रूप पालटणार असून, अपघातांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल. नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

Related to this topic: