Risod BLO beating: रिसोडमध्ये निवडणूक आयोगाच्या मतदार यादी पुनर्निरक्षण कार्यक्रमांतर्गत काम करत असताना बीएलओला मारहाण झाली. कर्मचाऱ्यांमध्ये संताप वाढला, कठोर कारवाईसाठी मागणी.
रिसोड (Risod BLO beating) : निवडणूक आयोगाच्या मतदार यादी पुनर्निरक्षण या कार्यक्रमा अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एसआयआर प्रक्रिया सुरू आहे या प्रक्रियेनुसार मतदारांची मॅपिंग प्रक्रिया सुरू असून शहर व तालुक्यात बिरो सदर काम करत आहेत. शहरात 'एस.आय.आर.' (SIR) मॅपिंगचे काम करत असलेल्या एका बीएलओला (BLO) बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज, ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात नवनाथ पांडुरंग बोंडे (वय ४३) हे गंभीर जखमी झाले असून, या घटनेमुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ बोंडे हे रिसोड शहरात आपल्या नेमून दिलेल्या क्षेत्रात एस.आय.आर. मॅपिंगचे शासकीय काम करत होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते कर्तव्यावर असताना त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. या (Risod BLO beating) मारहाणीत बोंडे यांच्या शरीराला गंभीर जखमा झाल्या आहेत.घटनेनंतर जखमी अवस्थेत बोंडे यांना तातडीने रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी वाशिम येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
बीएलओ बांधवांमध्ये भीतीचे सावट
सध्या सर्वत्र निवडणूक विभागाच्या वतीने महत्त्वाची कामे सुरू आहेत. अशा परिस्थितीत भरदिवसा एका (Risod BLO beating) कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मॅपिंगचे काम करणाऱ्या इतर बीएलओंमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. "आम्ही सुरक्षित नसू असा सवाल कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.या भ्याड हल्ल्याचा निषेध करत, एस.आय.आर. मॅपिंग करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेची मागणी केली आहे. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन बीएलओ चे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्याकडे सोपविले व या संदर्भात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी दिला आहे. यावेळी रिसोड शहरातील बीएलओ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकरणी रिसोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली नव्हती.