Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी खासदार झालो: रामराव वडकुते

Dr. Babasaheb Ambedkar: हिंगोलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात रामराव वडकुते यांनी संविधानाच्या माध्यमातून खासदार झाल्याचे सांगितले.


डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी खासदार झालो रामराव वडकुते

Dr. Babasaheb Ambedkar |

हिंगोली (Dr. Babasaheb Ambedkar) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महान उपकार या देशातील प्रत्येक नागरिकांवर आहेत त्या  उपकारा मुळे व भारतीय संविधानामुळे मी खासदार झाल्याचे प्रतिपादन नवनियुक्त राज्यसभा खा.रामराव वडकुते यांनी केले. हिंगोली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोर आयोजित कार्यक्रमाप्रसंगी पुतळा समितीचे अध्यक्ष मधुकर मांजरमकर यांनी उपस्थित सर्वांचे पुष्पहार व शाल देवुन स्वागत केले.

उपस्थित सर्वांनी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी पुढे बोलताना खा. रामराव वडकुते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान डोळ्यास ठेवूनच मी आणि माझा  पक्ष सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कार्य करणार असल्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला. याप्रसंगी हिंगोली चे आमदार तानाजी मुटकुळे यांनी भारतीय जनता पार्टीनी आपल्या  सत्तेच्या कार्यकाळात अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत ज्यामध्ये लंडनच्या निवासस्थानाचा प्रश्न असो की,महाडच्या चवदार तळ्याचा विकास असो अशा प्रकारे स्थानिक स्तरावर ही आंबेडकरी जनतेच्या हितासाठी मोठ्या प्रमाणात विकासाची कामे हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी माजी आमदार डॉ .प्रज्ञाताई सातव, जिल्हा प्रभारी रेखाताई कुलकर्णी यांनीही आपले विचार व्यक्त केले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे,माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, फुलाजी शिंदे,जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे,विलास गोरे,सुनिताताई मुळे,आतिश दांडेगांवकर, नगरसेवक कैलास शहाणे अदिसह मोठ्या संख्येने भाजपच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचलन पत्रकार प्रकाश इंगोले यांनी केले तर आभार ऍड. दीपक मांजरमकर यांनी मानले.

Related to this topic: