Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

रामदासपेठ खून प्रकरणाचा छडा; प्रेमविवाहातून उद्भवलेल्या वादातून हत्या, ४ आरोपी ताब्यात

रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अलंकार मार्केट परिसरात घडलेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.


रामदासपेठ खून प्रकरणाचा छडा प्रेमविवाहातून उद्भवलेल्या वादातून हत्या ४ आरोपी ताब्यात

Ramdaspeth Murder Case |

अकोला (Ramdaspeth Murder Case) : रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अलंकार मार्केट परिसरात घडलेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. प्रेमविवाहातून निर्माण झालेल्या वादातून हा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मृतक राहुल कालू सारसर याने आरोपींच्या भाचीसोबत प्रेमविवाह केला होता. याच कारणावरून आरोपींनी कटकारस्थान रचून गैरकायद्याची मंडळी तयार केली. त्यानंतर १५ मे २०२६ रोजी राज मंदिर बारच्या गल्लीमध्ये राहुल याच्यावर पाईप व धारदार शस्त्रांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून रामदासपेठ पोलीस ठाण्यात अप क्रमांक ३७८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ६१(२), १०३(२), ३५१(२)(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली.

तपासादरम्यान आरोपी बादशहा सरू पारोचे (वय ३५, रा. वरणगाव, ता. भुसावळ, जि. जळगाव) हा फरार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला १६ मे रोजी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता आरोपीला २० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान, उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू ठेवला. आरोपी भुसावळ परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत जळगाव-भुसावळ हायवेवर सापळा रचला.

या कारवाईत संतोष रामचरण पारोचे (वय २४, रा. विजय नगर, तारफैल, अकोला), गौरव राहुल करोसिया (वय १८) आणि हारीश उर्फ हर्षउ राहुल करोसिया (वय २०, दोघे रा. आंबेडकर नगर, वरणगाव, जि. जळगाव) यांना ताब्यात घेण्यात आले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके, सपोनि विजय जाधव, पोउपनि गोपाल जाधव, विष्णू बोडखे, माजीद पठाण तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Related to this topic: