Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

जय श्रीराम जय सेवालालच्या जयघोषाने दुमदुमली पोहरादेवी नगरी !

बंजारा समाजाची काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील देवी जगदंबा माता, संत सेवालाल महाराज व संत रामराव बापू मंदीर सेवा आश्रमात श्रीराम भगवान यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.


जय श्रीराम जय सेवालालच्या जयघोषाने दुमदुमली पोहरादेवी नगरी  

Ram Navami Festival |

मानोरा (Ram Navami Festival) : बंजारा समाजाची काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील देवी जगदंबा माता, संत सेवालाल महाराज व संत रामराव बापू मंदीर सेवा आश्रमात मयार्दा पुरुषोत्तम श्रीराम भगवान यांचा जन्मोत्सव पाळणा गीत, भोग भंडारा, आरदास व महाआरती करून लाखो भाविकांच्या साक्षीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जय श्रीराम, जय सेवालाल, जय रामराव बापू यांच्या नावाच्या जयघोषाने पोहरादेवी नगरी दुमदुमून गेली होती. देशभरातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान बहुजन, बंजारा काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी व उमरी खुर्द येथे दरवर्षी रामनवमी निमित्त यात्रा महोत्सव हर्ष उल्हासात साजरा केला जातो. यावर्षी गुरुवारी दि. २६ मार्च रोजी सुध्दा  रामनवमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

रामनवमी दिनी मयार्दा पुरुषोत्तम श्रीराम यांचा जन्मोत्सव दुपारी १२ वाजता संत सेवालाल महाराज व जगदंबा माता मंदिरात महंत कबिरदास महाराज यांच्या हस्ते व संत डॉ रामराव बापू सेवा आश्रमात धर्मगुरु या. बाबुसिंग महाराज व देवी बापू भक्त शेखर महाराज यांच्या हस्ते पाळणा, भोग भंडारा, आरदास व महाआरती करून लाखो सेवा भक्तांच्या साक्षीने साजरा करण्यात आला. रामनवमी यात्रा महोत्सव निमित्त आदल्या दिवसापासूनच श्रीराम जन्मोत्सव व देवी, संताचे आशीर्वाद व यात्रा महोत्सवासाठी देशभरातील महाराष्ट्र नव्हे कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली आदीसह लाखो भाविकांनी हजेरी लावली होती.

नांदेड, परभणी, मंठा, जालना आदीसह इतर भागातून पायदळ दिंडीद्वारे हजारो सेवा भक्त दर्शनासाठी दाखल झाले होते. त्यांचा मंदीर संस्थानच्यावतीने महंतांनी स्वागत करून सत्कार केला. यावेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, तेलंगणा व कर्नाटकचे आजी माजी मंत्री, समाजातील प्रतिष्ठीत नागरीक व मान्यवर यांनी श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याला हजेरी लावून देवी जगदंबा माता व संताच्या समाधीस्थळी माथा टेकून दर्शन घेतले. बारीने रांगेत उभे राहून हजारो भाविकांची दर्शन घेण्यासाठी चिक्कार गर्दी जमली होती. त्यानंतर भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी शेतात, झाडाखाली व मिळेल त्या ठिकाणी भाविक नवस फेडताना जमले होते. यात्रा महोत्सवात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस अधिक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी चोख कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवला होता. यात्रा महोत्सवात प्रशासनाच्या वतीने आरोग्य विषयक सुविधा, पिण्याचे आणि आदींची व्यवस्था केली होती. अनेक स्वयंसेवी संस्थांनी भाविक भक्तांना अन्नदान कार्यक्रम राबवून सेवा दिली. रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने पोहरादेवीत समाज बांधवांच्यावतीने सामाजिक, सांस्कृतिक विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. धर्मपीठ भक्तीधाम येथे धर्मगुरु जितेंद्र महाराज यांच्या हस्ते भगवान श्रीराम यांचा जन्मोत्सव थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी हजारो भाविक भक्तांनी हजेरी लावत महाप्रसादाचा लाभ घेतला.

Related to this topic: