State Teacher Strike: २१ एप्रिलपासून राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षक बेमुदत संपावर जाणार. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना निवेदन देऊन जुन्या पेन्शन योजनेच्या मागण्या केल्या.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना दिले निवेदन
हिंगोली (State Teacher Strike) : दिर्घकाळ प्रलंबित असणार्या जिव्हाळ्याच्या रास्त मागण्यांची आग्रह व्यक्त करण्यासाठी २१ एप्रिलपासुन राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षक बेमुदत संपावर जात असल्याने या संदर्भात जिल्हाधिकारी राहूल गुप्ता यांना राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदन दिले.
या निवेदनात नमुद केले की, महाराष्ट्र शासनाने १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त कर्मचार्यांना जुनी पेन्शन बंद करून तिला पर्याय म्हणुन राज्य सरकारची डीसीपीएस / एनपीएस योजना सुरू केली आहे. या नवीन पेन्शन योजनेत कर्मचार्यांच्या वेतनातील रक्कम बाजारात विविध कंपन्यात गुंतवून त्यातून कर्मचार्यांना पेन्शन योजनेत कर्मचार्यांच्या वेतनाची रक्कम पेन्शन म्हणुन देण्याचे धोरण होते. परंतु कर्मचार्यांना जुनी पेन्शन प्रमाणे निवृत्ती वेतन मिळताना दिसत नाही, यासह इतर १७ मागण्यांसाठी राज्य सरकारी मध्यवर्ती (State Teacher Strike) कर्मचारी संघटनेने २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

या (State Teacher Strike) अनुषंगाने २० एप्रिलला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष दिलीप कदम यांच्यासह आम्रपाली चोरमारे, जी.ए. कंठे, आर. ए. चव्हाण, ए.व्ही. पवार, जी.एस. दुभळकर, डि.एस. निमजे, ए.व्ही. पाथरकर, ए.एम. भुसारे, विजय घ्यार, पी.एस. गोटे, व्ही. डी. पांडे, एस. बी. नाईकनवरे, हरी पिसाळ, एम.बी. डाखोरे, पी.व्ही. काळबांडे, खैरनार, एस.एन. कदम आदींच्या स्वाक्षर्या आहेत.