Breaking News
  • 'जगाच्या नकाशावर राहायचं की इतिहासजमा व्हायचं?'; पाकिस्तानला लष्करप्रमुखांचा थेट इशारा
  • यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली
  • अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त
  • बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला
  • दिवे घाटात दहशत पसरवणाऱ्या बुलेट राजांचा माज पोलिसांनी मोडला!
  • शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
  • CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी
  • रत्नागिरी- जिल्ह्यात CNG GAS चा मोठ्या प्रमाणात तुटवडा
  • मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार;प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय

होम > आपले शहर > पुणे

पुण्यात गुरुवारी संपूर्ण पाणीपुरवठा बंद;तातडीच्या दुरुस्तीमुळे PMC चा मोठा निर्णय

शहरातील पाणीपुरवठ्याबाबत एक महत्त्वाची सूचना जाहीर करण्यात आली आहे.


पुण्यात गुरुवारी संपूर्ण पाणीपुरवठा बंदतातडीच्या दुरुस्तीमुळे pmc चा मोठा निर्णय

Pune Water Cut |

पुणे (Pune Water Cut) : शहरातील पाणीपुरवठ्याबाबत एक महत्त्वाची सूचना जाहीर करण्यात आली आहे. गुरुवार (१६ एप्रिल) रोजी संपूर्ण पुणे शहरात दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. विविध जलशुद्धीकरण प्रकल्प आणि पंपिंग केंद्रांमध्ये तातडीची दुरुस्ती व देखभाल कामे हाती घेतल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते गुरुवार मध्यरात्रीपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे.

या ठिकाणी होणार कामे
महापालिकेकडून नवीन व जुन्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये, खडकवासला जॅकवेल, वारजे, वडगाव तसेच लष्कर जलकेंद्र येथे विद्युत, पंपिंग आणि स्थापत्य दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील बहुतांश भागांमध्ये पाण्याचा पुरवठा खंडित राहील.

या भागांवर परिणाम
पर्वती जलसाठा क्षेत्रातील अनेक भागांना याचा फटका बसणार आहे. सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, कात्रज, धनकवडी, आंबेगाव आणि कोंढवा या परिसरांमध्ये पाणी उपलब्ध होणार नाही.
तसेच हडपसर, मुंढवा, मांजरी, फुरसुंगी, खराडी, चंदननगर, विमाननगर, विश्रांतवाडी आणि लोहगाव या पूर्व भागातील क्षेत्रांमध्येही पाणीपुरवठा बंद राहील.
पश्चिमेकडील कोथरूड, बावधन, वारजे, बाणेर, बालेवाडी, औंध, पाषाण आणि सुस रोड परिसरालाही या बंदचा मोठा परिणाम जाणवणार आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, शुक्रवारी (१७ एप्रिल) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related to this topic: