Breaking News
  • 'जगाच्या नकाशावर राहायचं की इतिहासजमा व्हायचं?'; पाकिस्तानला लष्करप्रमुखांचा थेट इशारा
  • यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली
  • अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त
  • बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला
  • दिवे घाटात दहशत पसरवणाऱ्या बुलेट राजांचा माज पोलिसांनी मोडला!
  • शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
  • CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी
  • रत्नागिरी- जिल्ह्यात CNG GAS चा मोठ्या प्रमाणात तुटवडा
  • मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार;प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय

होम > आपले शहर > पुणे

पुणे हडपसरमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू प्रकरण; संशयित आरोपी ताब्यात, संयुक्त तपास सुरू

पुण्यातील हडपसर परिसरातील एका रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू ठेवल्याच्या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.


पुणे हडपसरमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू प्रकरण संशयित आरोपी ताब्यात संयुक्त तपास सुरू

Pune Bomb Scare |

पुणे (Pune Bomb Scare) : पुण्यातील हडपसर परिसरातील एका रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू ठेवल्याच्या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. बुधवारी संध्याकाळी रुग्णालयात टायमर लावलेला जिवंत बॉम्ब आढळल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. सुमारे सात तासांचा टायमर असलेली ही स्फोटक वस्तू पोलिसांनी वेळीच निकामी केली.

या घटनेनंतर पोलिसांनी रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दुचाकीवर आलेल्या एका व्यक्तीने संशयास्पद हालचाल करत बॉम्ब ठेवल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत काही तासांतच संबंधित संशयिताला अटक केली. सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ताब्यात घेतलेला आरोपी हा आरोग्य विभागाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास एटीएस आणि पुणे पोलिसांकडून संयुक्तपणे केला जात आहे. बॉम्बमध्ये वापरलेल्या जिलेटिनच्या कांड्या कुठून आणल्या, तसेच हा प्रकार करण्यामागचा उद्देश काय होता, याचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता, रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या उत्तरामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. “रुग्णालयात अनेकजण ये-जा करतात, प्रत्येकाची तपासणी करणे शक्य नाही. संबंधित व्यक्ती ओपीडी बंद असताना आला होता. प्रत्येकाच्या बॅगची तपासणी करणे आमच्या आवाक्याबाहेर आहे,” असे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले. या भूमिकेमुळे रुग्णालयातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Related to this topic: