Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

चिखली तहसील कार्यालयामार्फत 'समाधान शिबिराचे' आयोजन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

सर्वसामान्यांचे प्रश्न स्थानिक पातळीवर सुटावेत आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळावा, या उद्देशाने चिखली तहसील कार्यालयाच्या वतीने विशेष 'समाधान शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे.


 चिखली तहसील कार्यालयामार्फत समाधान शिबिराचे आयोजन नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

Public Welfare Schemes |

चिखली (Public Welfare Schemes) : सर्वसामान्यांचे प्रश्न स्थानिक पातळीवर सुटावेत आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळावा, या उद्देशाने चिखली तहसील कार्यालयाच्या वतीने विशेष 'समाधान शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 1.दि.10  एप्रिल  2026 रोजी  धोडप मंडळामध्ये जिल्हा परिषद शाळा , धोडप  2.दि.16  एप्रिल  2026 रोजी मेरा खुर्द  मंडळा मध्ये विश्रामगृह , मेरा खुर्द , 3. दि.17  एप्रिल  2026 रोजी पेठ मंडळा मध्ये ज्ञानेश्वर विद्यालय , पेठ  व 4. दि. 24 एप्रिल  2026 रोजी शेळगाव आटोळ  मंडळा मध्ये जिल्हा परिषद शाळा, शेळगाव आटोळ  येथे आयोजित करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत शेतकरी व नागरिकांना खालील नमूद योजनांचा लाभ प्रदान करण्यात येणार आहे.

    फेरफार अदालत घेणे :प्रलंबित नोदणीकृत व अनोदणीकृत फेरफार मंजूर करणे

    पंतप्रधान आवास योजना व इतरा राज्य स्तरीय घरकुल योजने अंतर्गत मंजूर घरकुल यांना 5 ब्रास प्रती घरकुल या प्रमाणे मोफत वाळू उपलब्ध करणे व त्याबाबत अर्ज मंजुरी देणे 

    PM किसान योजनेतर्गत  पात्र शेतकरी यांचे land seeding करणे 

     नैसर्गिक आपत्ती मध्ये नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांचे eKYC करणे व उर्वरित शेतकरी यांची यादी अपलोड करणे 

    डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ फेरफार वाटप करणे 

     Agristack अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक  (farmer ID) तयार करणे

     नवीन आधार नोंदणी व आधीचे आधार अद्यावत करून देणे,

     उत्पन्न दाखला/जात प्रमाणपत्र/ नॉनक्रिमिलेर प्रमाणपत्र /राष्ट्रीयत्व,वय,अधिवास प्रमाणपत्र /शेतकरी दाखला /भूमिहीन दाखला/ऐपत प्रमाणपत्र ई. प्रमाणपत्र प्रदान करणे,

     मतदान कार्ड वाटप करणे, आधार मतदान कार्ड जोडणी करणे,

     विशेष सहाय योजना लाभ देणे,

     संजय गांधी निराधार योजनेबाबत आधार validation बाबत  कार्यवाही करणे. 

    मोजणी शिट क प्रत वाटप करणे.

     पुरवठा विभागांमार्फत नवीन रेशन कार्ड /रेशन कार्ड दुरुस्ती/नाव कमी करणे नुसार digital Ration card प्रदान करणे

     रेशन कार्ड बाबत eKYC करणे.

     गावातील अकुशल व्यक्तींना जॉबकार्ड प्रदान करणे,

     आभा कार्ड प्रदान करणे

     प्रधानमंत्री जन आरोग्य योजना/महात्मा फुले जन आरोग्य योजना लाभ देणे,

     आरोग्य तपासणी व लसीकरण,

     महा DBTपोर्टल वर खालील वैयक्तिक लाभाचे योजनाचे लाभ देणे (फळ बाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण, कोल्ड स्टोरेज,सेडनेट, पॉलीहाउस, सिंचन साधने, शेत तळे इत्यादी)

     पंतप्रधान आवास योजना व इतर राज्यस्तरीय घरकुल योजनेतर्गत लाभ प्रदान करणे.

     ग्रामविकास विभागातर्फे वैयक्तिक लाभाचे/योजनाचे लाभ प्रदान करणे,

    जन्म / मृत्यू नोंद , विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करणे.

शेतजमीन अकृषिक (NA) करण्यासाठी लागणारी स्वतंत्र ‘सनद’ किंवा जिल्हाधिकाऱ्यांची विशेष परवानगी घेण्याची अट रद्द करण्यात आली आहे.जमिनीचा अकृषिक वापर करण्यासाठी आता केवळ एकदाच रूपांतरण अधिमूल्य भरावे लागेल, तसेच वार्षिक NA करही रद्द करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ जाहीर केली असून या योजनेअंतर्गत शेतातील रस्ते पक्के (बारमाही) करण्यात येणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीची ने-आण करणे तसेच शेतमाल वाहून नेणे अधिक सुलभ होणार आहे.तसेच १५ नोव्हेंबर १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेल्या जमिनींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता ‘मानीव नियमित’ करण्यात निर्णय आहे. इत्यादी योजनेचा लाभ हा या शिबिरामध्ये देण्यात येणार आहे तरी चिखली तालुक्यामधील  सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन चिखली चे तहसीलदार श्री विजय सवडे यांनी केले आहे.

Related to this topic: