Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांची राज्य तपासणी व सहनियंत्रण समितीच्या सदस्यपदी निवड

डॉ. प्रज्ञाताई सातव यांचा वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्य सरकारने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.


आमदार डॉ प्रज्ञाताई सातव यांची राज्य तपासणी व सहनियंत्रण समितीच्या सदस्यपदी निवड

Public Health Committee |

कळमनुरी (Public Health Committee) : महिलांचे आरोग्य, पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी आणि आरोग्य सेवांमधील पारदर्शकता तपासण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या राज्य तपासणी व सहनियंत्रण समितीच्या सदस्यपदी आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांची निवड करण्यात आली आहे.

डॉ. प्रज्ञाताई सातव यांचा वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्य सरकारने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सुविधांच्या दर्जाची तपासणी करणे, गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी सुनिश्चित करणे, तसेच सर्वसामान्य जनतेला मिळणाऱ्या आरोग्य सेवांमधील त्रुटी दूर करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही समिती काम करणार आहे.

या निवडीमुळे मराठवाड्यातील महिला आरोग्य आणि बाल लिंग गुणोत्तर सुधारण्याच्या कामाला बळ मिळणार असून महाराष्ट्रात मुलींचे घटते प्रमाण ही गंभीर समस्या असून ती रोखण्यासाठी ही समिती केंद्रांची अचानक तपासणी करून कारवाई करण्याचे अधिकार या समितीला आहेत.

या निवडीनंतर डॉ. प्रज्ञाताई सातव यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आरोग्य विभागाच्या या महत्त्वाच्या समितीच्या माध्यमातून राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आणि विशेषतः माता-बाल आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर ठोस काम करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळवून देणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट राहणार आहे, तसेच या निवडीबद्दल मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांचे त्यांनी आभार मानले.

Related to this topic: