Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

भाजप प्रज्ञा सातव

प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेच्या पोट निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी जाहीर

BJP Pragya Satav: डॉ. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, त्यांना विधान परिषदेच्या पोट निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी त्या याच जागेवर होत्या.


प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेच्या पोट निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी जाहीर 

BJP Pragya Satav |

दैनिक देशोन्नतीने आधीच व्यक्त केले होते भाकीत

हिंगोली (BJP Pragya Satav) : विधान परिषदेच्या ज्या जागेचा डॉक्टर प्रज्ञा सातव (BJP Pragya Satav) यांनी राजीनामा दिला होता त्याच जागेवर त्यांना भारतीय जनता पक्षाने पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. याबाबत दैनिक देशोन्नतीने यापूर्वीच भाकीत केले होते. 
   
महाराष्ट्र विधानसभे तील 10 रिक्त जागांसाठी 12 मे रोजी निवडणूक होणार आहे. यातील नऊ जागा कार्यकाळ पूर्ण झाल्याने रिक्त झाल्या असून एका जागे वर पोटनिवडणूक होत आहे. ही जागा डॉ. प्रज्ञा सातव यांनी यापूर्वी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झाली होती. त्याच जागेवर त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर पक्षातर्फे त्यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव (BJP Pragya Satav) यांना दुसऱ्यांदा विधान परिषदेवर काँग्रेसने पाठविले होते. या जागेचा त्यांनी अचानक राजीनामा दिला. या जागे सोबत त्यांनी काँग्रेस पक्षाचाही राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला होता. या प्रवेशाच्या वेळीच त्यांना भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याची चर्चा होती. त्यानुसार 2030 पर्यंतच्या कार्यकाळासाठी डॉ. प्रज्ञा सातव यांच्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा मार्ग मोकळा झाला आहे.

विरोधी पक्षातून आलेल्या दोघांचे भाजपने केले पुनर्वसन

विरोधी पक्षातून आलेल्या दोन नेत्यांचे भारतीय जनता पक्षाने पुनर्वसन केले आहे. यापूर्वी रामराव वडकुते यांना पक्षाने राज्यसभेवर घेतले आहे रामराव वडकुते हे राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते होते. पक्षाने त्यांना विधान परिषदेवर पाठविले होते. विधान परिषदेचा काही काळ शिल्लक असताना रामराव वडकुते यांनी पदाचा व पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यांना राज्यसभेवर घेतल्यानंतर आता काँग्रेस मधून आलेल्या डॉक्टर प्रज्ञा सातव (BJP Pragya Satav) यांना परत विधान परिषदेवर घेऊन भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षातून घेतलेल्या दोन नेत्यांचे पुनर्वसन केले आहे. हे दोन्ही नेते ओबीसी मतदारांचे प्रतिनिधी असल्याने भविष्यात या नेत्यांचा पक्षाला काय उपयोग होतो याकडे आता सर्वांचे लक्ष राहील.

Related to this topic: