Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

खापरखेडा वीज प्रकल्पात करंट लागून कामगाराचा मृत्यू

खापरखेडा येथील 210 मेगावॅट वीज प्रकल्पात मंगळवारी सकाळी झालेल्या दुर्घटनेत करंट लागून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.


खापरखेडा वीज प्रकल्पात करंट लागून कामगाराचा मृत्यू 

Power Plant Accident |

खापरखेडा (Power Plant Accident) : खापरखेडा येथील 210 मेगावॅट वीज प्रकल्पात मंगळवारी सकाळी झालेल्या दुर्घटनेत करंट लागून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बॉयलर मेंटेनन्स विभागात काम करणारे अनंता शेंडे (रा. भानेगाव) यांना कामादरम्यान करंट लागला. ही घटना सकाळी सुमारे 11.30 वाजता घडल्याचे सांगितले जात आहे. जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर पुढील तपासणीसाठी मेयो रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याची माहिती आहे.

सदर काम एम टेक कंपनीमार्फत सुरू असून, ही कंपनी कोराडी येथील संदीप दिवाण यांची असल्याचे समजते. या कंपनीमार्फतच हे काम पेटी कॉन्ट्रॅक्ट स्वरूपात भानेगाव येथील वसंता बावणे यांनी घेतले होते. मृतक अनंता शेंडे हा मूळचा भानेगाव येथील असला तरी मागील नऊ वर्षांपासून सिल्लेवाडा येथे आपल्या सासरे महादेव मेश्राम यांच्या घरी पत्नी व सात वर्षीय मुलीसह वास्तव्यास होता. तो कुटुंबातील एकमेव कमावता व्यक्ती असल्याने या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, कामादरम्यान ओल्या जागेत वायरिंग करताना संपर्क आल्याने करंट लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या घटनेबाबत एम टेक कंपनीचे संचालक संदीप दिवाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण हरिद्वार येथे असल्याचे सांगितले. तसेच वीज केंद्राचे चीफ इंजिनियर विवेक रोकडे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर नियमानुसार कंपनीकडून नुकसानभरपाई देण्यास तयारी दर्शविल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी अधिकृत तपास सुरू असून, सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का, याबाबतही चौकशी होण्याची शक्यता आहे.

Related to this topic: