Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

सुरक्षित मातृत्वासाठी 'प्रधानमंत्री मातृवंदन योजना' ठरतेय वरदान

महिलांच्या सर्वांगीण विकासासोबतच सुरक्षित मातृत्व हा प्रत्येक महिलेचा मूलभूत अधिकार मानला जातो.


सुरक्षित मातृत्वासाठी प्रधानमंत्री मातृवंदन योजना ठरतेय वरदान

PMMVY Scheme |

राज्यात लाखो महिलांना लाभ; नागपूर विभागातही उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर (PMMVY Scheme) : महिलांच्या सर्वांगीण विकासासोबतच सुरक्षित मातृत्व हा प्रत्येक महिलेचा मूलभूत अधिकार मानला जातो. याच उद्देशाने केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणारी 'प्रधानमंत्री मातृवंदन योजना' राज्यात प्रभावीपणे कार्यरत असून ती महिलांसाठी वरदान ठरत आहे. गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना सकस आहार घेण्यासाठी प्रोत्साहन देणे, तसेच काम करणाऱ्या महिलांना वेतनातील नुकसान भरपाई देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे महिलांना गर्भधारणेदरम्यान आवश्यक विश्रांती घेणे शक्य होत असून सुरक्षित प्रसूतीस चालना मिळत आहे.

राज्यात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून सुमारे लाख ७० हजारांहून अधिक महिलांनी नोंदणी केली आहे. या योजनेमुळे मातामृत्यू आणि बालमृत्यू दर कमी होण्यास मदत होत आहे. विशेषतः नागपूर विभागात या योजनेचा प्रभाव लक्षणीय दिसून येतो. नागपूर जिल्ह्यात १८ हजार २६२ महिलांनी नोंदणी केली असून त्यापैकी १६ हजार २२० महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. यातील १५ हजार १६९ महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. तसेच एप्रिलपासून नव्याने ७८९ महिलांची नोंदणी करण्यात आली आहे. प्रधानमंत्री मातृवंदन योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना पहिल्या अपत्याच्या जन्मावेळी हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही टप्प्याटप्याने लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाते. दुसरे अपत्य मुलगी रक्कम असल्यास एकाच टप्प्यात हजार रुपये देण्यात येतात. या आर्थिक सहाय्यामुळे महिलांना गर्भधारणेदरम्यान येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करता येते. तसेच रुग्णालयात प्रसूती करण्यास आणि बालकांचे वेळेवर लसीकरण करण्यास प्रोत्साहन मिळते. योजनेअंतर्गत लाभमिळविण्यासाठी गर्भधारणेची नोंदणी शासकीय किंवा मान्यताप्राप्त खासगी आरोग्य केंद्रात करणे आवश्यक आहे. शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी केल्यास हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला जातो. त्यानंतर बाळाची जन्मनोंदणी आणि प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यानंतर हजार रुपयांचा दुसरा हप्ता दिला जातो.

साडेतीन लाख महिलांची नोंदणी

राज्यात आतापर्यंत ४२ लाख ९९ हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असून एकूण हजार ९३३ कोटी ९७ लाख रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. २०२३-२४ या वर्षात लाख ६२ हजार २१५ महिलांची नोंदणी झाली असून पात्र लाभार्थ्यांना थेट निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे ही योजना केवळ आर्थिक सहाय्यापुरती मर्यादित राहता मातृ आणि बाल आरोग्य सुधारण्यास महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

 

Related to this topic: