Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

पेट्रोल डिझेल

कळमनुरी तालुक्यातील पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगांच रांगा

Petrol Diesel Crisis: आखाडा बाळापूरमध्ये जागतिक युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल व डिझेल बंद होण्याच्या अफवामुळे पेट्रोल पंपावर भारी गर्दी झाली.


कळमनुरी तालुक्यातील पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगांच रांगा

Petrol Diesel Crisis |

आखाडा बाळापूर (Petrol Diesel Crisis) : जागतिक युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल व डिझेल बंद होणार असल्याच्या अफवेने बुधवार दुपारी व रात्री तसेच गुरुवारी सकाळपासूनच पेट्रोल डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली असल्याचे चित्र कळमनुरी व आखाडा बाळापूर शहराबरोबरच तालुक्यातील विविध भागात असलेल्या (Petrol Diesel Crisis) पेट्रोल पंपावर बघायला मिळत आहे. आखातातील सुरु असलेल्या युद्धामुळे पेट्रोल डिझेल, पुरवठा कमी होणार असल्याच्या अफवा होत आहे.

यामुळे बुधवार दुपारपासून तालुक्यातील पेट्रोल पंपावर दुचाकी चारचाकी वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या रात्री अनेक ठिकाणी पंप बंद करण्यात आले होते. गुरुवारी पुन्हा भल्या सकाळपासूनच पेट्रोल पंपाबाहेर वाहनधारकांची मोठी गर्दी होती. वाढती गर्दी व उपलब्ध साठा यानुसार अनेक ठिकाणी मागणीपेक्षा कमी पेट्रोल, डीझेल देण्यात येत होते तर अनेकांनी साठा करण्यासाठी मोठे कैन,डबे आणले त्यांना (Petrol Diesel Crisis) पेट्रोल, डिझेल मिळाले नाही, जे दुचाकी, चारचाकी वाहन आले त्यांना कमीजास्त इंधन देण्यात येत होते.

दरम्यान काल रात्री उशिरापर्यंत (Petrol Diesel Crisis) पेट्रोल पंपावर वाहनधारक गर्दी होती आजही सकाळपासून गर्दी होती याठिकाणी पोलीस उपनिरीक्षक गणेश गोटके पोलीस पथकाने भेट देउन वाहनधारकांना, नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगण्याचे आवाहन केले. in Kurunda

Related to this topic: